कोरोनाने बसविले घरी, बायकोपेक्षा ‘ती’च बरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:50 IST2021-03-04T04:50:01+5:302021-03-04T04:50:01+5:30

सांगली : कोरोनाचा लॉकडाऊन काळ नातेसंबंधांतील प्रेमाचे लॉकडाऊन करणारा ठरला. सोशल मीडियावरील पोस्ट, स्टेटसमुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना तर वाढल्याच, ...

Corona stays at home, she's better than his wife | कोरोनाने बसविले घरी, बायकोपेक्षा ‘ती’च बरी

कोरोनाने बसविले घरी, बायकोपेक्षा ‘ती’च बरी

सांगली : कोरोनाचा लॉकडाऊन काळ नातेसंबंधांतील प्रेमाचे लॉकडाऊन करणारा ठरला. सोशल मीडियावरील पोस्ट, स्टेटसमुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना तर वाढल्याच, शिवाय बायकोपेक्षा ‘ती’च बरी, म्हणून अनैतिक संबंधांच्या वाटेवरूनही काहीजण चालले. असे अनेक रंग या कोरोनाकाळाने दाखवून दिले.

सांगलीच्या महिला न्याय कक्ष, महिला व बालकल्याण विभाग यांच्याकडे यासंदर्भात गेल्या वर्षभरात अनेक तक्रारी दाखल झाल्या. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये तक्रारींचे प्रमाण कमी राहिले, तरीही कौटुंबिक हिंसाचाराचे स्वरूप मात्र बदलले. वेगळ्या व अचंबित करणाऱ्या तक्रारी दाखल झाल्या. यात एका कुटुंबातील महिलेने तिची लहान बहीण विधवा झाल्यानंतर तिला आसरा दिला. नंतर तिच्या पतीचे व लहान बहिणीचे प्रेमसंबंध निर्माण झाले. बायकोपेक्षा मेहुणीच हवी, म्हणून हे प्रकरण टोकाला गेले. मेहुणीने बाहेरील व्यक्तीशी सूत जुळवल्यानंतरही मोठ्या बहिणीच्या नवऱ्याचे वेड कमी झाले नाही. महिला न्याय कक्षाने त्यांचे काउन्सिलिंग करून त्यांचा संसार पुन्हा सुरळीत केला. कोरोनाकाळात घरी बसलेल्या नवरा-बायकोच्या संसारात सोशल मीडियावरील पोस्ट, स्टेटस व लाइक्सनी विष कालवल्याच्या घटनाही घडल्या.

महिला व बालकल्याण विभागाकडे नोंदलेल्या आकडेवारीनुसार २०१९ मध्ये सर्व प्रकारच्या कौटुंबिक हिंसाचाराच्या एकूण ६५३ तक्रारी न्यायालयात दाखल झाल्या, तर २०२० मध्ये न्यायालयात दाखल होणाऱ्या प्रकरणांचे प्रमाण ३६६ इतके होते.

चौकट

कॉस्मेटिक ब्युटीने पडली दरार

कोरोनाकाळात ज्या कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी आल्या, त्यात सोशल मीडियावरून झालेले गैरसमज अधिक आहेत. यात कॉस्मेटिक ब्युटीच्या तक्रारीची भर पडली. लग्न, साखरपुडा व मुलीला दाखविण्याच्या वेळी मुलीला पार्लरवालीने खूप सजविले. त्यावेळी ती किती छान होती, आता अशी का दिसतेय, अशा तक्रारी नवऱ्यांनी केल्या आहेत.

चौकट

आकडेवारी काय सांगते (महिला न्याय कक्ष)

२०१९ मधील तक्रारी ३८८

२०२० मधील तक्रारी २२३

चौकट

शंभरावर प्रकरणांत यशस्वी मध्यस्थी

महिला न्याय कक्षाकडे २०२० मध्ये २२३ तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यातील १०६ प्रकरणांत येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यशस्वी मध्यस्थी केली. कोरोनाकाळात दुबई, श्रीलंका व जयपूर याठिकाणी असलेल्या नवऱ्यांशी व्हिडीओ कॉलवरून संपर्क साधत या विभागाने यशस्वी तडजोडी केल्या.

Web Title: Corona stays at home, she's better than his wife