कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रम छुप्या पध्दतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:25 IST2021-05-22T04:25:59+5:302021-05-22T04:25:59+5:30
‘रोहयो’ची कामे सुरू करण्याची मागणी जत : काही गावांमधील मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांना रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काम ...

कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रम छुप्या पध्दतीने
‘रोहयो’ची कामे सुरू करण्याची मागणी
जत : काही गावांमधील मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांना रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काम उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या संकटामुळे गावातील काही नागरिकांकडे कामच नसल्यामुळे त्यांना कुटुंबाचे पालनपोषण करताना अडचण येत आहे.
फॅशन स्टेटस् जपणारे मास्क बाजारात
सांगली : वाढत्या कोरोना रुग्णांमुळे जिल्हा प्रशासनाने विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे बाजारपेठेत पुन्हा फॅन्सी मास्क उपलब्ध झाले आहेत. अनेकजण या मास्कला पसंती देत आहेत.
धूर फवारणी करण्याची मागणी
सांगली : शहरातील काही प्रभागांमध्ये डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी शहरात जागृती केली जात आहे. शहरातील सर्वच प्रभागांत आरोग्य जागृतीला वेग आला आहे. मात्र, कोरोनासह इतर आजार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने शहरातील प्रभागांमध्ये धूर फवारणी करून डासांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
सॅनिटाईज करण्याची मागणी
करगणी : आटपाडी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. पूर्वी रुग्ण आढळल्यानंतर संपूर्ण परिसर सॅनिटाईज करण्यात येत होता. मात्र, आता केवळ ज्या घरी रुग्ण आढळला, तेथे बोर्ड लावून प्रशासन मोकळे होते. परंतु, परिसर सॅनिटाईज करत नाही. त्यामुळे पुन्हा रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
परवानगी न घेताच घरांचे बांधकाम सुरु
सांगली : महापालिका क्षेत्रात घराचे बांधकाम करायचे असेल, तर महापालिकेकडून रितसर परवानगी घ्यावी लागते. मात्र, शहरातील काही घरमालक महापालिकेकडून परवानगी न घेताच घरांचे बांधकाम करत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे.