शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
3
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
4
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
5
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा
6
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
7
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
8
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
9
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
10
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
11
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
12
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
13
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
14
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
15
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
16
डोंबिवली एमआयडीसीत भीषण स्फोट; केमिकल कंपनीत बॉयलर फुटल्याने लागली आग
17
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
18
Adani चं मोठं यश, पहिल्यांदाच सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री घेणार समूहाची 'ही' कंपनी?
19
Rituals: महिलांचा मासिक धर्म सुरु असताना जोडप्याने एकत्र राहू नये असे शास्त्र सांगते; पण का? वाचा!
20
थरारक! ५ मिनिटांत ६००० फूट विमान खाली आलं; साक्षात मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला

corona in sangli-शिरसगावात  परगावच्या लोकांना नो एण्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 7:50 PM

शिरसगावच्या  गावकऱ्यांनी अन्य गावातील व्यक्तींना गावात प्रवेश बंदी केली आहे. याबाबत बुधवारी  कोरोना प्रतिबंधासाठी स्थापन केलेल्या ग्रामसमितीने निर्णय घेतला.

ठळक मुद्देशिरसगावात  परगावच्या लोकांना नो एण्ट्रीकोरोना प्रतिबंधासाठी खबरदारी : गावाकडे येणारा रास्तच केला  बंद 

कडेगाव : सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर संचारबंदीचे पालन केले  जात असून ग्रामीण भागात गावकरी दक्ष झाले आहेत.

शिरसगाव तालुका कडेगाव येथे कोरोना प्रतिबंधासाठी स्थापन केलेल्या ग्रामसमितीने खबरदारीच्या अनेक  उपाययोजना  केल्या आहेत मुंबई पुण्यासह मोठ्या शहरातून  गावात स्वगृही आलेल्या नागरिकांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. अन्य गावातील  कोणीही गावात येणार नाही यासाठी प्रवेश बंदी करण्यात आली आहे. गावात येणाऱ्या  रस्त्यावर  दगड व लाकडी ओंडके टाकून रस्ता बंद केला आहे.शिरसगावच्या  गावकऱ्यांनी अन्य गावातील व्यक्तींना गावात प्रवेश बंदी केली आहे. याबाबत बुधवारी  कोरोना प्रतिबंधासाठी स्थापन केलेल्या ग्रामसमितीने निर्णय घेतला.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र खबरदारीच्या उपाय योजना केल्या  आहेत. यात प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. तसेच गावकरी देखील स्‍वतःहून नियम पाळत आहेत. संचारबंदीचे काटेकोर पालन करण्यासाठी विविध कडक उपाययोजना केल्या आहेत. गावातील  किराणा मालाची दुकाने सकाळी ७ ते १०  व संध्याकाळी ५ ते  ८ यावेळेतच  उघडली जात आहेत.दुकानाबाहेर मार्किंग केलेल्या जागेत सुरक्षीत अंतरावर ग्रामस्थ उभा राहून  किराणा माल घेत आहेत.

गावातील खाजगी दवाखान्यात एकावेळी फक्त चारच रुग्ण घेण्याबत डॉक्टरांना सुचवले आहे.  गावाच्या सुरक्षितेसाठी आशा कडक उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे निश्चितच आपले गाव कोरोनापासून दूर राहील .असा विश्वास सरपंच सतीश मांडके यांनी व्यक्त केला .प्रवेशबंदीचे फलक अत्यावश्यक सेवा ,रुग्णवाहिका,प्रशासकीय अधिकारी,शासनाचे पास दिलेली वाहने याशिवाय अन्य कोणासही  कोरोना प्रतिबंधक गाव समितीच्या परवानगी शिवाय गावात प्रवेश मिळणार  नाही असा फलक गावच्या  प्रवेशद्वारावर लावला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली