शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
3
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
4
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
5
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
6
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
7
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
8
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
9
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
10
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
11
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
12
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
13
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
15
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
16
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
17
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला

corona in sangli- प्रफुलचंद घेटीया यांच्याकडून एक कोटी एक लाखाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2020 1:54 PM

सामाजिक उत्तरदायित्वाचे भान ठेवून राधेकृष्ण एक्स्ट्राक्शन प्रा. लि. चे कार्यकारी संचालक प्रफुल्लचंद्रा घेटीया यांच्याकडून 1 कोटी 1 लाख 51 हजार इतक्या मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांच्या कडे सुपूर्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे प्रफुलचंद घेटीया यांच्याकडून एक कोटी एक लाखाची मदतमदतीबद्दल जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी यांनी प्रशासनातर्फे दिले धन्यवाद

सांगली : सामाजिक उत्तरदायित्वाचे भान ठेवून राधेकृष्ण एक्स्ट्राक्शन प्रा. लि. चे कार्यकारी संचालक प्रफुल्लचंद्रा घेटीया यांच्याकडून 1 कोटी 1 लाख 51 हजार इतक्या मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांच्या कडे सुपूर्त करण्यात आला आहे.

कोवीड-19 च्या संसर्गामुळे जगभरात अभूतपूर्व अशी स्थिती निर्माण झालेली आहे. भारतातही या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे . सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात याला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे. कोवीड-19 मुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे.

अशा या संकटाच्या वेळी समाजाला धीर देण्यासाठी, आधार देण्यासाठी, मदतीचा हात देण्यासाठी समाजातील विविध घटकांनी मोठ्या प्रमाणावर पुढे येणे आवश्यक आहे , याच सामाजिक उत्तरदायित्वाचे भान ठेवून प्रफुल्लचंद्रा घेटीया यांच्याकडून 1 कोटी 1 लाख 51 हजार इतक्या मदतीचा धनादेश सुपूर्त करण्यात आला आहे.यावेळी राधाकृष्ण एक्स्ट्राक्शन प्रा. लि.चे पियुषभाई घेटीया, रोनक घेटीया, राज घेटीया, शिव घेटीया यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रफुल्लचंद्रा घेटीया यांनी सुपूर्त केलेल्या रकमेमध्ये प्रधानमंत्री सहायता निधीसाठी 51 लाख, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 45 लाख 51 हजार, जिल्हा प्रशासनासाठी 5 लाख असे एकूण 1 कोटी 1 लाख 51 हजारांची मदत यांचा समावेश आहे.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, घेटीया यांच्याकडून करण्यात आलेली मदत अत्यंत कौतुकास्पद व अभिनंदनीय आहे. या मदतीद्वारे त्यांनी व्यक्त केलेली प्रेम व भावना कोवीड-19 या साथरोगाच्या आस्मानी संकटातून उभारी देण्यास निश्चितच प्रेरणादायी ठरतील. यापुढेही घेटीया यांच्यासारखे अनेक दानवीर समाजाच्या मदतीसाठी पुढे येतील अशी आशा व्यक्त करून त्यांनी  घेटीया यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीSangliसांगली