शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
5
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
6
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
7
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
8
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
9
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
10
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
11
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
12
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
13
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
14
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
15
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
16
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
17
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

corona in sangi-कोरोनासाठी मोफत समुपदेशन सेवा सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 13:35 IST

सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभर भय आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या संकटकाळात लोकांना अनेक सावधगिरी बाळगण्याची सूचना करीत असतानाच मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देण्याचे आवाहन जगभरातील नागरिकांना केले आहे.

ठळक मुद्देकोरोनासाठी मोफत समुपदेशन सेवा सुरुजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली माहिती

सांगली : सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभर भय आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या संकटकाळात लोकांना अनेक सावधगिरी बाळगण्याची सूचना करीत असतानाच मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देण्याचे आवाहन जगभरातील नागरिकांना केले आहे.

कोरोना विषाणू भय, चिंता आणि नैराश्याचे कारण बनत चालला आहे. विविध अभ्यास पाहणीतुन असे लक्षात आले आहे की, रुग्ण असो की मग क्वारंटाईन अथवा आयसोलेशनमध्ये असलेले व्यक्ती किंवा कोरोनाचा उपचार सुरु असलेली व्यक्ती असो त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे.

मनोरुग्णावर देखील कोरोनाचा प्रभाव पडताना दिसतो आहे. कोवीड-19 या आजारासाठी प्रभावी उपचार उपलब्ध नसल्याने लोकांमध्ये भिती व गैरसमज निर्माण होऊन मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने सांगली जिल्ह्यातील सर्व लोकांसाठी मोफत समुपदेशन सेवा ही अभिनव योजना सुरु केली असून ही सेवा देण्यासाठी जिल्हास्तरावर मानसिक आरोग्य कक्ष स्थापन करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली आहे.कोरोनाच्या भितीमुळे मानसिक ताणतणाव निर्माण झाल्यास जिल्हा मानसिक आरोग्य कक्षातील मानसारेपचार तज्ञ व मानसशास्त्रज्ञ यांना प्रत्यक्ष भेटून किंवा मोबाईल वर बोलून आपल्या मनातील भीती व त्यामुळे उदभवणारे मानसिक ताणतणाव यांना समर्थपणे तोंड देऊ शकता, त्याशिवाय सदर कक्षातील तज्ञांकडून लॉकडाऊन कालावधीत घरात असलेले, विस्थपित कामगार, बेघर, परराज्यातील व परजिल्ह्यातील कामगार जे सध्या सांगली, मिरज व कुपवाड महानागरपालिका हद्दीतील निवारा गृहात आहेत, व्यसनाधिनतेमुळे निर्माण होणारे आजार, वसतिगृहातील अडकलेली मुले-मुली, वृध्दाश्रम, कारागृह, रिमांड होम, ऊस तोड कामगार, आरोग्य सेवा व पोलीस यंत्रणा यामधील सर्वासाठीही मोफत समुपदेशन व मोफत औषधोपचार करण्यात येणार आहे. 

मानसिक आरोग्य कक्षाकडे येणारी सर्व माहिती गोपनीय ठेवली जाईल. सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहनही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी केले आहे.जिल्हा मानसिक आरोग्य कक्षात कार्यरत सदस्यांचा संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहे. मानसपोचार तज्ञ डॉ. गजानन साकेकर मोबईल क्रमांक -9175577741, मानसपोचार तज्ञ डॉ. शितल शिंदे -  9922397582, मानसशास्त्रज्ञ डॉ. माणिकराव सुर्यवंशी मोबईल क्रमांक -  9604965701, समुपदेशक अविनाश शिंदे मोबईल क्रमांक - 8007259119, मनोविकृती परिचारिका लॉरेन्स आवळे- 9834151603 असा आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली