महापालिकेच्या रोजंदारी कर्मचार्‍याचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:26 IST2020-12-31T04:26:45+5:302020-12-31T04:26:45+5:30

मिरज : महापालिकेच्या मिरजेतील उद्यान विभागातील बागमाळी दत्तात्रय गणपती मंडलिक (वय ५०) यांचे कोरोनामुळे उपचार सुरू असताना बुधवारी ...

Corona, a salaried employee of the corporation, died | महापालिकेच्या रोजंदारी कर्मचार्‍याचा कोरोनाने मृत्यू

महापालिकेच्या रोजंदारी कर्मचार्‍याचा कोरोनाने मृत्यू

मिरज : महापालिकेच्या मिरजेतील उद्यान विभागातील बागमाळी दत्तात्रय गणपती मंडलिक (वय ५०) यांचे कोरोनामुळे उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे निधन झाले. कोरोनाने मृत्यू झालेले दत्तात्रय मंडलिक हे बागमाळी या पदावर गेली ३२ वर्षे रोजंदारीवर काम करीत होते.

मिरजेत गेल्या सहा महिन्यात कोरोनामुळे स्वच्छता निरीक्षकासह चार महापालिका कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. दत्तात्रय मंडलिक यांना आठवड्यापूर्वी कोरोनाची लागण झाल्याने मिरज शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेचे डॉ. महेशकुमार कांबळे यांनी मृत दत्तात्रय मंडलिक यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये मदत देण्याची मागणी आयुक्तांकडे निवेदनाद्धारे केली आहे.

Web Title: Corona, a salaried employee of the corporation, died