कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा घट; नवीन २९३ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:27 IST2021-09-03T04:27:42+5:302021-09-03T04:27:42+5:30

जिल्ह्यातील ११ जणांचा मृत्यू झाला. यात सांगलीतील ५, मिरज तालुक्यातील ३, तर कवठेमहांकाळ, शिराळा आणि वाळवा तालुक्यांतील प्रत्येकी एकाचा ...

Corona relapse; 293 new patients | कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा घट; नवीन २९३ रुग्ण

कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा घट; नवीन २९३ रुग्ण

जिल्ह्यातील ११ जणांचा मृत्यू झाला. यात सांगलीतील ५, मिरज तालुक्यातील ३, तर कवठेमहांकाळ, शिराळा आणि वाळवा तालुक्यांतील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

आरोग्य विभागाने आरटीपीसीआर अंतर्गत २८१६ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात १२६ जण बाधित आढळले, तर रॅपिड अँटिजनच्या ५१२५ जणांच्या नमुने तपासणीतून १७४ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

उपचार घेत असलेल्या ३००२ रुग्णांपैकी ६०५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ५१० जण ऑक्सिजनवर, तर ९५ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील सातजण उपचारासाठी दाखल झाले.

चौकट

आतापर्यंतचे एकूण मृत्यू १९२९७९

उपचार घेत असलेले ३००२

कोरोनामुक्त झालेले १८४९०६

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ५०७१

गुरुवारी दिवसभरात

सांगली २१

मिरज ९

आटपाडी २८

कडेगाव ४६

खानापूर ५९

पलूस ५

तासगाव ३०

जत १३

कवठेमहांकाळ २१

मिरज तालुका ४०

शिराळा २

वाळवा १९

Web Title: Corona relapse; 293 new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.