जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम, नवे २२७ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:27 IST2021-03-31T04:27:29+5:302021-03-31T04:27:29+5:30
सांगली : जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे नवे २२७ रुग्ण आढळून आले, तर चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, १८१ जणांनी ...

जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम, नवे २२७ रुग्ण
सांगली : जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे नवे २२७ रुग्ण आढळून आले, तर चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, १८१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. मंगळवारी सांगलीत ४२, तर मिरजेतील ४१ रुग्ण आढळून आले. जत १०, खानापूर ४, तासगाव तालुक्यात १४, आटपाडीत २१, कडेगाव २९, पलूस व कवठेमहांकाळ तालुक्यात प्रत्येकी ८, मिरज १७, शिराळा ९, तर वाळवा तालुक्यात २४ नव्या रुग्णांची भर पडली आहे. कोल्हापूर ३, सोलापूर व पुणे येथील प्रत्येकी एक रुग्ण जिल्ह्यात उपचारासाठी दाखल झाले आहेत.
दिवसभरात आटपाडी, कडेगाव, कवठेमहांकाळ आणि सांगली येथील चार रुग्णांचा मृत्यू झाला, तर १८१ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या १७२ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
चौकट
आतापर्यंतचे बाधित : ५१४१९
कोरोनामुक्त झालेले : ४७६६७
उपचाराखालील रुग्ण : १९५६
आतापर्यंतचे मृत्यू : १७९६
चौकट
सोमवारी दिवसभरात
सांगली : ४२
मिरज : ४१
आटपाडी : २१
कडेगाव : २९
खानापूर : ०४
पलूस : ०८
तासगाव : १४
जत : १०
कवठेमहांकाळ : ०८
मिरज : १७
शिराळा : ०९
वाळवा : २४