कोरोना रुग्णाची सहा तोळ्यांची चेन प्रामाणिकपणे परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:28 IST2021-05-13T04:28:17+5:302021-05-13T04:28:17+5:30
मिरजेतील मिशन हॉस्पिटलमध्ये आवळे या आया म्हणून काम करतात. तेथे मालती मधुकर जोशी यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ...

कोरोना रुग्णाची सहा तोळ्यांची चेन प्रामाणिकपणे परत
मिरजेतील मिशन हॉस्पिटलमध्ये आवळे या आया म्हणून काम करतात. तेथे मालती मधुकर जोशी यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. या वेळी गडबडीत जोशी यांनी ६ तोळे सोन्याची चेन रिपोर्ट फाईलमध्ये ठेवली हाेती. चार दिवसांनी खोलीची स्वच्छता करताना आवळे यांनी रिपोर्ट फाईल उघडून पहिली असता त्यात सोन्याची चेन सापडली. त्यांनी ती पिशवी पती अमोल आवळे यांच्यामार्फत जोशी यांना परत दिली. हरवलेला माैल्यवान ऐवज परत दिल्याबद्दल जोशी कुटुंबीयांनी शांभवी आवळे यांचे आभार मानले. या प्रामाणिकपणाबद्दल आमदार सुधीर गाडगीळ यांनी आवळे यांचा सत्कार केला. आजच्या जमान्यातही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे उदाहरण यानिमित्ताने समाेर आले, अशी प्रतिक्रिया गाडगीळ यांनी या वेळी व्यक्त केली. याप्रसंगी प्रकाश बिरजे, स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, चंद्रकांत कुलकर्णी, गणपती साळुंखे आदी उपस्थित होते.