कोरोनामुळे डोळे उघडले, रुग्णालये वाढली, सुविधाही वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:19 IST2021-07-01T04:19:28+5:302021-07-01T04:19:28+5:30
सांगली : गरजेतून वैद्यकीय क्षेत्राला सक्षमतेचे वरदान लाभल्याचे चित्र कोरोना काळात निर्माण झाले आहे. वैद्यकीय पंढरी असलेल्या मिरज, सांगली ...

कोरोनामुळे डोळे उघडले, रुग्णालये वाढली, सुविधाही वाढल्या
सांगली : गरजेतून वैद्यकीय क्षेत्राला सक्षमतेचे वरदान लाभल्याचे चित्र कोरोना काळात निर्माण झाले आहे. वैद्यकीय पंढरी असलेल्या मिरज, सांगली परिसरातील कच्चे दुवेही कोरोना काळात समोर आले आणि गेल्या दीड वर्षात वैद्यकीय क्षेत्राचा चेहराच बदलून गेला.
वैद्यकीय पंढरीतील वैद्यकीय सुविधा, पॅरामेडिकल स्टाफ, मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल्स यांची कोविड व्यवस्थापनात मोठी मदत मिळाली. यातच मागील अनुभवातून सुधारणा करीत जिल्हा प्रशासनाने कोविडसाठी आवश्यक सामग्री अधिक वाढवली. त्यामुळे दुसऱ्या लाटेत इतकी रुग्णसंख्या वाढल्यानंतरही बेडची टंचाई मागील वर्षाच्या तुलनेत कमी जाणवली. मागील वर्षापेक्षा यावेळी कोविड व्यवस्थापनात वैद्यकीय यंत्रणा व उपकरणांची संख्या वाढली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. जिल्हा कोविड रुग्णालये, डेडिकेटड (समर्पित) कोविड हेल्थकेअर सेंटर्स, कोविड केअर सेंटर्स यांच्या माध्यमातून जिल्ह्यात सध्या कोविडचे व्यवस्थापन सक्षमपणे करता आले.
चौकट
सरकारी रुग्णालये
मागीलवर्षी १७
यावर्षी १९
खासगी रुग्णालये
मागीलवर्षी २४
यावर्षी ४२
आयसीयू बेडस्
मागीलवर्षी ६१९
यावेळी ६५६
व्हेंटिलेटर्स
मागीलवर्षी २६०
यावर्षी २६६
ऑक्सिजन उपलब्धता
मागीलवर्षी ६ के.एल.
यावर्षी ३१ के. एल.
चौकट
ग्रामीण भागातही वाढ
जिल्ह्यातील ग्रामीण भागात २०२० मध्ये फारशा वैद्यकीय सुविधा नव्हत्या. त्यामुळे त्याचा ताण सांगली, मिरजेतील कोविड रुग्णालयांवर पडला होता. त्यामुळे रुग्णांचे हाल झाले. या अनुभवातून शहाणपणा घेऊन यावेळी तालुकास्तरावर, ग्रामीण भागात ऑक्सिजन बेडसह अन्य वैद्यकीय सुविधा, रुग्णालये यावर भर देण्यात आला.
ऑक्सिजन यंत्रेही वाढविली
ऑक्सिजन सिलिंडरची उपलब्धता वाढविण्यावरही जिल्हा प्रशासनाने अधिक भर दिला. सध्या लहान ६९३, जंबो १३६७, ड्युरा ७७ सिलिंडर उपलब्ध आहेत. याशिवाय सामाजिक संस्थांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या माध्यमातून वैद्यकीय सुविधेला बळ दिले. सध्या असे २५० हून अधिक कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध आहेत.
कोट
जिल्ह्यातील वैद्यकीय यंत्रणेत अधिक सक्षमता आली आहे. मागीलवर्षाच्या अनुभवातून यावेळी रुग्णालये, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन उपलब्धता वाढविण्यात आली. नियोजन समितीच्या माध्यमातून वैद्यकीय उपकरणे व अन्य सुविधांसाठी निधी खर्च केला जात आहे.
- डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी