जिल्हा परिषदेत तीन अधिकाऱ्यांसह नऊजणांना कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:26 IST2021-04-10T04:26:20+5:302021-04-10T04:26:20+5:30

सांगली : जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कवठेमहांकाळचे गटविकास अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या शाखा अभियंत्यांसह वित्त, बांधकाम, कृषी विभागातील ...

Corona to nine including three officers in the Zilla Parishad | जिल्हा परिषदेत तीन अधिकाऱ्यांसह नऊजणांना कोरोना

जिल्हा परिषदेत तीन अधिकाऱ्यांसह नऊजणांना कोरोना

सांगली : जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कवठेमहांकाळचे गटविकास अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या शाखा अभियंत्यांसह वित्त, बांधकाम, कृषी विभागातील नऊजणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे. प्रशासनाने मुख्यालयासह दहा पंचायत समित्यांमधील कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्केच ठेवली आहे. तसेच अभ्यागतांना जिल्हा परिषदेत प्रवेश देणे पूर्णत: बंद केले आहे.

जिल्हा परिषदेत पहिल्या टप्प्यात ८४ जणांना कोरोनाची लागण झाली होती तर चारजणांचा बळी गेला होता. आता मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून पुन्हा कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. शुक्रवारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कवठेमहांकाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता आणि बांधकाम, कृषी, वित्त, शिक्षण विभागातील सहा कर्मचारी अशा नऊजणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यापैकी तिघांना जास्त त्रास जाणवत असल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित घरीच उपचार घेत आहेत. रुग्ण सापडलेल्या ठिकाणची तातडीने स्वच्छता करुन घेतली आहे. जिल्हा परिषदेत बाहेरुन येणाऱ्यांवर पुन्हा अधिक निर्बंध लावण्यात आले आहेत. कर्मचारी, अधिकारी बाधित आढळल्याने बाहेरून येणाऱ्यांची संख्या आटोक्‍यात राहावी, असे नियोजन करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्क्यांनी कमी केल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांनी सांगितले.

चौकट

गर्दी रोखण्याची गरज

जिल्हा परिषदेने गेल्या आठवड्यापासून एकाच प्रवेशव्दारातून ये-जा सुरु ठेवली आहे. नाव नोंदवून, ताप तपासूनच प्रवेश दिला जात आहे. मास्कची सक्ती आहे. सॅनिटायझरही वापरले जात आहे, मात्र गर्दी कमी झालेली नाही. जिल्ह्याची कोरोना वॉर रूम जिल्हा परिषदेतच आहे. याठिकाणी वर्दळ जास्त असल्यामुळे येथील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

Web Title: Corona to nine including three officers in the Zilla Parishad