सावळजमध्ये प्रशासनाकडून व्यावसायिकांची कोरोना तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:19 IST2021-06-10T04:19:40+5:302021-06-10T04:19:40+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसलेल्या सावळज गावात गेल्या दोन महिन्यांत अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला. रोज २० ...

सावळजमध्ये प्रशासनाकडून व्यावसायिकांची कोरोना तपासणी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसलेल्या सावळज गावात गेल्या दोन महिन्यांत अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला. रोज २० हून अधिक लोक पॉझिटिव्ह येत होते. रुग्णसंख्या वाढत चालल्याने गावामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले हाेते. विलगीकरण कक्ष स्थापन केला गेला. दरम्यान, हळूहळू कोरोनाचा धोका कमी झालेला दिसत आहे. कोरोनामुळे लावलेले प्रशासकीय निर्बंध गेल्या दोन- तीन दिवसांपूर्वी शिथिल करण्यात आले. व्यवसायास वेळेचे बंधन ठेवून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, गावातील सर्वच व्यावसायिकांची कोरोना चाचणी घेण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला. या अनुषंगाने बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयात १७३ व्यावसायिकांची कोरोना चाचणी झाली. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. अद्यापही काही व्यावसायिक व कर्मचाऱ्यांची तपासणी बाकी आहे. त्यांचीही तपासणी केली जाणार असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितले आहे.
यावेळी सरपंच स्वाती पोळ, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी प्रमोद भोसले, डॉ. माणिक गंगाधरे, मनोज माळी, योगेश काटे, आशासेविका, ग्रामपंचायत सदस्य अविनाश म्हेत्रे, विनोद कोळी, कल्पना धेंडे, विजय चव्हाण, संदीप पाटील, अमोल पोळ, राजेश गायकवाड, नागेश सुतार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.