कामेरीत पुन्हा कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:27 IST2021-03-31T04:27:09+5:302021-03-31T04:27:09+5:30
कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथे २१ जानेवारीनंतर शुक्रवारी २६ मार्च रोजी पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आज ...

कामेरीत पुन्हा कोरोनाचा शिरकाव
कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथे २१ जानेवारीनंतर शुक्रवारी २६ मार्च रोजी पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आज मंगळवार ३० मार्च रोजी एक पुरुष बाधित झाल्याने रुग्ण संख्या तीन झाली आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या एका अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. दोन जणांवर घरीच, तर एकावर इस्लामपूर येथील कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन चिवटे यांनी सर्दी, खोकला, ताप लक्षणे जाणवत असतील तर नागरिकांनी आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा व कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे. तसेच एक हजारांपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक व इतर आजार असणाऱ्या लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली असून, ४५ वयापुढील नागरिकांना १ एप्रिलपासून लस दिली जाणार आहे. त्यांनी कोणतीही भीती न बाळगता लवकरात लवकर लस घ्यावी व कोरोनापासून आपला बचाव करावा, असे आवाहनही केले आहे.