कामेरीत पुन्हा कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:27 IST2021-03-27T04:27:45+5:302021-03-27T04:27:45+5:30

कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथे इस्लामपूरपाठोपाठ सर्वाधिक २७१ जणांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यानंतर २१ जानेवारी रोजी ...

Corona infiltrates the chamber again | कामेरीत पुन्हा कोरोनाचा शिरकाव

कामेरीत पुन्हा कोरोनाचा शिरकाव

कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथे इस्लामपूरपाठोपाठ सर्वाधिक २७१ जणांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यानंतर २१ जानेवारी रोजी गाव कोरोनामुक्त झाले होते. शुक्रवार, दि. २६ मार्च रोजी राजकीय व साहित्यिक पार्श्वभूमी असणाऱ्या दि. बा. पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली. आपल्या सान्निध्यात आलेल्यांनी लक्षणे जाणवत असल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन चिवटे यांनी सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे जाणवत असतील तर नागरिकांनी आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा व कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे. आतापर्यंत एक हजारांपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक व इतर आजार असणाऱ्या लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. इतरांनीही भीती न बाळगता लवकरात लवकर लस घ्यावी व कोरोनापासून आपला बचाव करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Corona infiltrates the chamber again