कोरोना अडचणीतही कर्जवसुली सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:20 IST2021-06-02T04:20:42+5:302021-06-02T04:20:42+5:30

सांगली : गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे अर्थकारण पूर्णपणे कोलमडून गेले असतानाही बँका, पतसंस्थांकडून पुन्हा एकदा वसुली सुरू करण्यात आली ...

Corona continues to recover even in trouble | कोरोना अडचणीतही कर्जवसुली सुरूच

कोरोना अडचणीतही कर्जवसुली सुरूच

सांगली : गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे अर्थकारण पूर्णपणे कोलमडून गेले असतानाही बँका, पतसंस्थांकडून पुन्हा एकदा वसुली सुरू करण्यात आली आहे. प्रशासनाने याबाबत हात वर केले असून, रिझर्व्ह बँकेकडून कर्जवसुली थांबविण्याबाबत काेणत्याही सूचना नसल्याने वसुली थांबवता येणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे.

----

निर्बंध शिथिल; तरीही आढावा घेणार

सांगली : कोरोना संसर्गामुळे लागू करण्यात आलेले निर्बंध १ जूनपासून शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, या शिथिलतेनंतर बाजारपेठेत अनावश्यक गर्दी वाढत असल्याचे दिसून आल्यास पुन्हा कारवाई करण्यात येणार आहे. दर आठवड्याला याबाबतचा आढावा घेऊन त्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी स्पष्ट केले.

----

पावसाळा तोंडावर; तरीही गटारींची स्वच्छता नाहीच

सांगली : मान्सूनची चाहूल लागल्याने येत्या आठवडाभरात पावसास सुरुवात हाेण्याची शक्यता असून, अद्यापही शहरातील, उपनगरांतील गटारींचे मार्ग प्रवाहित करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे गटारे तुंबण्याची शक्यता आहे. महापालिकेने दरवर्षी याचे काम करण्यात येते. मात्र, यंदा अद्यापही उपनगरातील प्रमुख गटारींचे काम करण्यात आलेले नाही.

----

अध्यक्ष बंगल्यासमोर रस्त्याची वाट

सांगली : विश्रामबागमध्ये पोलीस मुख्यालयास लागूनच असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षांच्या ‘वसंत’ बंगल्यासमोर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी पाणी प्रवाहित होत नसल्याने ते रस्त्यावरच साचून राहत आहे. त्यामुळे पूर्ण रस्ताही खराब झाला आहे. या ठिकाणी नेमके वळण असल्याने सांगलीहून येत कुपवाडकडे जाणाऱ्या वाहनांची कसरत होत आहे.

----

मॉर्निंग वॉकसाठी पुन्हा रस्ते फुलले

सांगली : कोरोना संसर्ग वाढत असल्याने लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये सोमवारपासून शिथिलता देण्यात आल्यानंतर मॉर्निंग वाॅकसाठी पुन्हा गर्दी होऊ लागली आहे. नागरिक मास्कचा वापर करूनच बाहेर पडत असल्याने सुरक्षितता बाळगली जात असली तरी अनेकजण विनामास्क फिरताना आढळत आहेत. विनामास्क रस्त्यांवर फिरू नये यासाठी पोलिसांकडून कारवाईही सुरूच आहे.

Web Title: Corona continues to recover even in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.