कोरोनाने जगण्याच्या संकल्पना बदलल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:24 IST2021-01-18T04:24:15+5:302021-01-18T04:24:15+5:30

कोकरुड : कोरोनामुळे लोकांच्या जगण्यासाठीच्या सर्व संकल्पना बदलून गेल्या आहेत. त्यामुळे सतत गंभीर असण्यापेक्षा खळखळून हसले पाहिजे, सतत विनोदबुद्धी ...

Corona changed the concept of survival | कोरोनाने जगण्याच्या संकल्पना बदलल्या

कोरोनाने जगण्याच्या संकल्पना बदलल्या

कोकरुड : कोरोनामुळे लोकांच्या जगण्यासाठीच्या सर्व संकल्पना बदलून गेल्या आहेत. त्यामुळे सतत गंभीर असण्यापेक्षा खळखळून हसले पाहिजे, सतत विनोदबुद्धी जोपासली पाहिजे, असे प्रतिपादन पुणे साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.

कोकरुड (ता. शिराळा) येथे कोकरुड ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजित केलेल्या शिवाजीराव देशमुख व्याख्यानमालेतील समारोपाचे तिसरे पुष्प गुंफताना ‘जीवनातील विनोदाचे स्थान’ या विषयावर ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख होते. तामिळनाडू सरकारचे सचिव आनंद पाटील, पोलीस उपअधीक्षक अमर मोहिते, फत्तेसिंगराव देशमुख, माजी सभापती बाळासाहेब पाटील, हणमंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. जोशी म्हणाले, आज समाज हास्याला पोरका झाला आहे. जीवनातील सर्व दुःखे विसरायची असतील, तर जे लोक तणावमुक्त जगतात, त्यांचा सहवास धरला पाहिजे. तरच माणूस सुखी होईल.

बाबासाहेब परीट यांनी स्वागत केले. संजय घोडे-पाटील यांनी आभार मानले. यावेळी सुवर्णा नांगरे, उपसभापती बी. के. नायकवडी, विकास नांगरे, सरपंच विलास वाघमारे, उपसरपंच पोपट पाटील, सहा. आयुक्त अर्जुन सूर्यवंशी, डॉ. गजानन घोडे-पाटील, डॉ. प्रमोद वाघमारे, आयकर अधिकारी प्रदीप पाटील, प्रा. डॉ. दिनकर नांगरे, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, गौरी पाटील, अर्जुन घोडे, सुहास घोडे, अंकुश नांगरे, सुनील घोडे आदी उपस्थित होते.

चाैकट

शिवाजीराव देशमुखांचे विचार जोपासा

शिवाजीराव देशमुख यांच्यासारखे नेतृत्व या राज्याला कोकरुड गावाने दिले. ही फार मोठी बाब आहे. देशमुख यांचे विचार गावातील तरुणांनी जोपासले पाहिजेत, असे मत मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.

फोटो येणार आहे.

Web Title: Corona changed the concept of survival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.