कोरोनाची साखळी तुटलीच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:25 IST2021-05-01T04:25:14+5:302021-05-01T04:25:14+5:30

पुनवत : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पोलीस प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. गावपातळीवर आपत्ती व्यवस्थापन समितीने योग्य नियोजन ...

The corona chain must be broken | कोरोनाची साखळी तुटलीच पाहिजे

कोरोनाची साखळी तुटलीच पाहिजे

पुनवत : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पोलीस प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. गावपातळीवर आपत्ती व्यवस्थापन समितीने योग्य नियोजन व अंमलबजावणी करावी, अशा सूचना शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांनी केली आहे.

कणदूर, पुनवत येथील बैठकांमध्ये ते बोलत होते. सुरेश चिल्लावार म्हणाले, गतवर्षीच्या तुलनेत यावेळी कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. सध्या एकाच कुटुंबातील अनेकजण कोरोनाबाधित होत आहेत. हे अतिशय घातक आहे. कोरोना विषाणूची साखळी तुटली पाहिजे यासाठी सर्वांनी शासन व जिल्हाधिकारी यांच्या सूचनेचे काटेकोरपणे पालन करावे व गावपातळीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन गाव सुरक्षित ठेवावे.

कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या लोकांचे विलगीकरण करावे तसेच होम क्वॉरंटाईन असलेले कोणीही घराबाहेर पडू नये. आरोग्य विभागाच्या सूचनेचे पालन करावे. कोरोनाला हद्दपार करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे.

बैठकीला उपसरपंच आनंदराव पाटील, दिलीप पाटील, संजय पाटील, संपत पाटील, पोलीस पाटील बाबासाहेब वरेकर, संभाजी पाटील ग्रामपंचायत व आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: The corona chain must be broken