जिल्हा क्रीडा संकुलातील कोरोना सेंटर साडेचार महिन्यांनी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:54 IST2021-09-02T04:54:52+5:302021-09-02T04:54:52+5:30
सांगली-मिरज रस्त्यावरील क्रीडा संकुलातील कोरोना सेंटरमध्ये जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पाहणी केली. यावेळी अतिरिक्त ुख्यकार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार ...

जिल्हा क्रीडा संकुलातील कोरोना सेंटर साडेचार महिन्यांनी बंद
सांगली-मिरज रस्त्यावरील क्रीडा संकुलातील कोरोना सेंटरमध्ये जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पाहणी केली. यावेळी अतिरिक्त ुख्यकार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांचयसह अधिकारी उपस्थति होते
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्हा क्रीडा संकुलातील १५६ खाटांचे डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर मंगळवारी (दि.३१) बंद करण्यात आले. साडेचार महिन्यांच्या कालावधीत केंद्रात दोन हजार रुग्णांवर कोरोनाचे उपचार झाले. हे केंद्र म्हणजे जिल्हा प्रशासनाच्या कोरोना अभियानातील आदर्श उदाहरण ठरले होते.
दुसऱ्या लाटेत १५ एप्रिलरोजी केंद्र सुरु झाले होते. आजवर १ हजार ७८६ रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात आले. १३९ रुग्णांना अधिक चांगल्या उपचारांसाठी अन्यत्र पाठविले. उपचारांदरम्यान १०८ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या रुग्णसंख्या घटल्याने केंद्र बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी घेतला. डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, पॅरामेडिकल स्टाफ यांनी रुग्णसेवेत चांगले योगदान दिल्याचे ते म्हणाले. भविष्यात रुग्ण वाढल्यास केंद्र पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. केंद्रामध्ये सात व्हेन्टीलेटर बेड, दोन बायपॅप मॉनिटर, पाच हायफ्लो ऑक्सिजन बेड व पाच मॉनिटर अशी सुविधा होती. सर्व म्हणजे १५६ बेडसाठी ऑक्सिजन पुरवठा होता. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, केंद्राचे अध्यक्ष चंद्रकांत गुडेवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्या देखरेखीखाली कामकाज सुरु राहिले.
रुग्णसेवेसाठी तीन वैद्यकीय अधीक्षक, निवासी वैद्यकीय अधिकारी, चार कन्सल्टन्ट, सहा एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी, १६ वैद्यकीय अधिकारी, २३ समुदाय आरोग्य अधिकारी, तीन आयुष वैद्यकीय अधिकारी, दोन दंतशल्य चिकित्सक, ४६ परिचारिका, तीन समुपदेशक, मानसोपचार तज्ञ, ११ औषध निर्माता, ईसीजी तंत्रज्ञ, डाटा एन्ट्री ऑपरेटर आदी कर्मचारीवर्ग नियुक्त होता. रुग्णांना सर्व औषधोपचार, भोजन, तपासण्या, एक्सरे आदी सुविधा पूर्णत: मोफत देण्यात आल्या.
चौकट
उत्तम उपचार, आरोग्यदायी सुविधा
सांगलीसह अन्य जिल्हे आणि शेजारच्या राज्यातील रुग्णांवरही या केंद्रात उपचार झाले. चांगले उपचार आणि आरोग्यदायी सुविधा मिळाल्यानेच कोरोनासारख्या जीवघेण्या आजारातून निभावल्याच्या प्रतिक्रिया रुग्णांनी व्यक्त केल्या.