कोरोनाने पालक गमावलेल्या बालकांची माहिती देण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:25 IST2021-05-23T04:25:23+5:302021-05-23T04:25:23+5:30
सांगली : कोरोना आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या जिल्ह्यातील बालकांची माहिती संकलित केली जात आहे. कोरोनावरील उपचारासाठी रुग्णालयात दाखल ...

कोरोनाने पालक गमावलेल्या बालकांची माहिती देण्याचे आवाहन
सांगली : कोरोना आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या जिल्ह्यातील बालकांची माहिती संकलित केली जात आहे. कोरोनावरील उपचारासाठी रुग्णालयात दाखल होतेवेळी बालकाचा ताबा कोणाकडे द्यावा याची रुग्णांकडून भरून घ्यावी व याची माहिती १०९८ या क्रमांकावर अथवा बाल कल्याण समितीशी संपर्क करून द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले आहे.
कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संगोपन होण्याच्या दृष्टीने स्थापन केलेल्या टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
अशा बालकांची माहिती मिळाल्यास त्यांना मदत करणे सोपे जाणार आहे. त्यामुळे टोल फ्री क्रमांकावर याची माहिती द्यावी, अशा जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.
यावेळी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव विश्वास माने, उपायुक्त राहुल रोकडे, बाल कल्याण समिती अध्यक्षा सूचेता मलवाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी बी. टी. नागरगोजे आदी उपस्थित होते.