जिल्ह्यात ९५४ जणांना कोरोना; ३१ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:18 IST2021-06-10T04:18:30+5:302021-06-10T04:18:30+5:30
सांगली : जिल्ह्यात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण बुधवारीही कायम होते. दिवसभरात ९५४ जणांना कोरोनाचे निदान झाले, तर १,०५९ जण ...

जिल्ह्यात ९५४ जणांना कोरोना; ३१ जणांचा मृत्यू
सांगली : जिल्ह्यात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण बुधवारीही कायम होते. दिवसभरात ९५४ जणांना कोरोनाचे निदान झाले, तर १,०५९ जण कोरोनामुक्त झाले. परजिल्ह्यातील ४ जणांसह जिल्ह्यातील २७ जणांचा मृत्यू झाला. म्युकरमायकोसिसचे नवे ३ रुग्ण आढळून आले, तर एकाचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात दिवसाला हजार रुग्णांचे प्रमाण अद्यापही कायम आहे. जिल्ह्यात २७ जणांचा मृत्यू झाला. यात सांगली ४, कुपवाड १, वाळवा, पलूस, मिरज तालुक्यात प्रत्येकी ५, जत, कवठेमहांकाळ, शिराळा तालुक्यात प्रत्येकी २ आणि कडेगाव तालुक्यात एकाचा मृत्यू झाला.
आरोग्य यंत्रणेने आरटीपीसीआरअंतर्गत २,४७६ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली, त्यात ३९० जण बाधित आढळले, तर रॅपिड अँटिजनच्या ५,८२३ जणांच्या तपासणीतून ५८८ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येतील घट कायम असून, सध्या ९,०१८ जण उपचार घेत आहेत. त्यातील १,३५१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील १,१२३ जण ऑक्सिजनवर, तर २२८ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील ४ जणांचा मृत्यू झाला असून, नवे २४ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत.
चौकट
म्युकरमायकोसिसचे तीन नवे रुग्ण आढळले असून, एकाचा मृत्यू झाला आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १,२६,४९०
उपचार घेत असलेले ९,०१८
कोरोनामुक्त झालेले १,१३,८२३
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ३,६४९
पॉझिटिव्हिटी रेट ११.७८
बुधवारी दिवसभरात
सांगली ११
मिरज २३
आटपाडी २०
कडेगाव १०१
खानापूर ५९
पलूस ४५
तासगाव ५५
जत ६९
कवठेमहांकाळ ५६
मिरज तालुका ८७
शिराळा ९६
वाळवा २३०