जिल्ह्यात ९४८ जणांना कोरोना; ३० जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:19 IST2021-06-11T04:19:13+5:302021-06-11T04:19:13+5:30

जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट गुरुवारी कमी झाल्याने दिलासा मिळाला तरीही मृत्यूचे सत्र कायम आहे. जिल्ह्यात २२ जणांचा मृत्यू झाला असून, ...

Corona to 948 people in the district; 30 killed | जिल्ह्यात ९४८ जणांना कोरोना; ३० जणांचा मृत्यू

जिल्ह्यात ९४८ जणांना कोरोना; ३० जणांचा मृत्यू

जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट गुरुवारी कमी झाल्याने दिलासा मिळाला तरीही मृत्यूचे सत्र कायम आहे. जिल्ह्यात २२ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात सांगली २, मिरज १, मिरज तालुक्यात ६, वाळवा ४, शिराळा ३, पलूस, कडेगाव प्रत्येकी २, तासगाव, जत तालुक्यांत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.

आरोग्य यंत्रणेने आरटीपीसीआर अंतर्गत २९०३ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ३६५ जण बाधित आढळले, तर रॅपिड अँटिजनच्या ६४४३ जणांच्या नमुने तपासणीतून ६१७ जणांना कोरेाना झाला आहे. प्रशासनाने नमुने तपासणीचे प्रमाण वाढवले असून, गुरुवारी चाचण्यांपेक्षा बाधितांचे प्रमाण कमी आले आहे. गुरुवारी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १०.५१ टक्के इतका राहिला.

बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे. त्यानुसार आता ९१२९ उपचार घेत असून, त्यातील १३०९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील १०८० जण ऑक्सिजनवर, तर २२९ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. जिल्ह्यात सध्या होम आयसोलेशनमध्ये सात हजार २४३ रुग्ण उपचार घेत आहेत. व्हेंटिलेटरवरील रुग्णांची संख्या कायम असली तरी ऑक्सिजनवरील रुग्णसंख्या कमी झाली आहे. परजिल्ह्यातील ८ जणांचा मृत्यू झाला, तर नवे ३४ रुग्ण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झाले.

चौकट

म्युकरमायकोसिसचे नवे २ रुग्ण आढळले आहेत. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संंख्या २३१ वर पाेहोचली असून, आतापर्यंत १४ जणांचा म्युकरमायकोसिसने मृत्यू झाला आहे.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित १२७४३८

उपचार घेत असलेले ९१२९

कोरोनामुक्त झालेले ११४६३८

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ३६७१

पॉझिटिव्हिटी रेट १०.५१

गुरुवारी दिवसभरात

सांगली ८८

मिरज ३१

आटपाडी २४

कडेगाव ६६

खानापूर ४८

पलूस ८५

तासगाव ६६

जत ६८

कवठेमहांकाळ ७१

मिरज तालुका १४३

शिराळा ११२

वाळवा १४५

Web Title: Corona to 948 people in the district; 30 killed