जिल्ह्यात ८७२ जणांना कोरोना; १२९२ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:19 IST2021-05-31T04:19:44+5:302021-05-31T04:19:44+5:30

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली असून, अडीच महिन्यांत प्रथमच एक हजाराच्या आत रुग्णसंख्या आली. रविवारी दिवसभरात ८७२ ...

Corona to 872 people in the district; 1292 corona free | जिल्ह्यात ८७२ जणांना कोरोना; १२९२ जण कोरोनामुक्त

जिल्ह्यात ८७२ जणांना कोरोना; १२९२ जण कोरोनामुक्त

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली असून, अडीच महिन्यांत प्रथमच एक हजाराच्या आत रुग्णसंख्या आली. रविवारी दिवसभरात ८७२ जणांना कोरोनाचे निदान झाले, तर १२९२ जण कोरोनामुक्त झाले. परजिल्ह्यातील आठजणांसह जिल्ह्यातील २७ अशा ३५ जणांचा मृत्यू झाला. म्युकरमायकोसिसच्या रुग्णसंख्येत मात्र वाढ झाली असून, एका दिवसात २९ जणांना निदान झाले आहे.

कोरोनाबाधितांची संख्या घटली असली तरी रविवारी चाचण्यांचेही प्रमाण कमी होते. जिल्ह्यातील २७ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात सांगली ३, मिरज १, कुपवाड १, तासगाव ४, वाळवा, खानापूर, मिरज तालुक्यांत प्रत्येकी ३, जत, कडेगाव प्रत्येकी २, तर आटपाडी तालुक्यात एकाचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य यंत्रणेने रविवारी आरटीपीसीआर अंतर्गत २००९ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ४६९ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे. रॅपिड अँटिजनच्या २९३८ जणांच्या तपासणीतून ४२५ जण बाधित आढळले आहेत.

उपचार घेत असलेल्या रुग्णसंख्येत पुन्हा घट होताना सध्या १२ हजार १०५ जण उपचार घेत आहेत. त्यातील १८२६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील १६०२ जण ऑक्सिजनवर, तर २२४ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

परजिल्ह्यातील आठजणांचा मृत्यू झाला असून, नवीन २२ जण उपचारासाठी दाखल झाले आहेत.

चौकट

म्युकरमायकोसिसचे नवे २९ रुग्ण

कोरोनापाठोपाठ म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढतच असून, रविवारी दिवसभरात २९ जणांना निदान झाले आहे.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित ११७३८६

उपचार घेत असलेले १२१०५

कोरोनामुक्त झालेले १०१८८०

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ३४०१

रविवारी दिवसभरात

सांगली ७४

मिरज ४७

तासगाव ११८

शिराळा १११

वाळवा ९९

मिरज तालुका ८७

कडेगाव ८३

जत ६७

खानापूर ६४

आटपाडी ४३

कवठेमहांकाळ ४१

पलूस ३८

Web Title: Corona to 872 people in the district; 1292 corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.