जिल्ह्यात ८०१ जणांना कोरोना; २४ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:19 IST2021-06-22T04:19:28+5:302021-06-22T04:19:28+5:30

सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत साेमवारी पुन्हा वाढ झाली. दिवसभरात ८०१ जणांना कोरोनाचे निदान झाले तर परजिल्ह्यातील तिघांसह जिल्ह्यातील ...

Corona to 801 people in the district; 24 killed | जिल्ह्यात ८०१ जणांना कोरोना; २४ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात ८०१ जणांना कोरोना; २४ जणांचा मृत्यू

सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत साेमवारी पुन्हा वाढ झाली. दिवसभरात ८०१ जणांना कोरोनाचे निदान झाले तर परजिल्ह्यातील तिघांसह जिल्ह्यातील २१ अशा २४ जणांचा मृत्यू झाला. बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढतच असून ९५२ जण कोरोनामुक्त झाले. पंधरवड्यात प्रथमच म्युकरमायकोसिसचा एकही रुग्ण न आढळल्याने दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यातील २१ जणांचा मृत्यू झाला. त्यात सांगली, मिरज प्रत्येकी २, वाळवा ४, मिरज तालुक्यात ३, खानापूर, तासगाव प्रत्येकी २, आटपाडी, जत, शिराळा आणि पलूस तालुक्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.

सोमवारी आरटीपीसीआर अंतर्गत २४०४ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ३०० जण बाधित आढळले, तर रॅपिड अँटिजनच्या ७१५१ जणांच्या तपासणीतून ५१४ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

उपचार घेत असलेल्या ८४३७ रुग्णांपैकी १०१० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ८६५ जण ऑक्सिजनवर तर १४५ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील तिघांचा मृत्यू तर १३ नवे रुग्ण उपचारास दाखल झाले आहेत.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित १३६९५९

उपचार घेत असलेले ८४३७

कोरोनामुक्त झालेले १२४६१३

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ३९०९

पॉझिटिव्हीटी रेट ८.५२

सोमवारी दिवसभरात

सांगली ४४

मिरज १६

आटपाडी १६

कडेगाव ५५

खानापूर ४५

पलूस ८५

तासगाव ४४

जत ३१

कवठेमहांकाळ ३६

मिरज तालुका १११

शिराळा ६३

वाळवा २३५

Web Title: Corona to 801 people in the district; 24 killed