जिल्ह्यात ७५१ जणांना कोरोना; २६ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:27 IST2021-07-29T04:27:12+5:302021-07-29T04:27:12+5:30
सांगली : जिल्ह्यातील काेरोना रुग्णसंख्येत बुधवारी घट होत नवीन ७५१ रुग्ण आढळले. रुग्णसंख्या घटली असली तरी मृत्यूंचे प्रमाण कायम ...

जिल्ह्यात ७५१ जणांना कोरोना; २६ जणांचा मृत्यू
सांगली : जिल्ह्यातील काेरोना रुग्णसंख्येत बुधवारी घट होत नवीन ७५१ रुग्ण आढळले. रुग्णसंख्या घटली असली तरी मृत्यूंचे प्रमाण कायम असून, परजिल्ह्यातील तिघांसह जिल्ह्यातील २३ अशा २६ जणांचा मृत्यू झाला आहे. बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून, १०८७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यातील २३ जणांचा मृत्यू झाला. त्यात सांगली २, तासगाव तालुक्यातील ६, वाळवा ५, खानापूर, कवठेमहांकाळ येथील प्रत्येकी ३, मिरज तालुक्यातील २ तर पलूस, जत तालुक्यातील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.
आरोग्य यंत्रणांनी आरटीपीसीआर अंतर्गत ३,२७६ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली, त्यात २१७ जण पॉझिटिव्ह आढळले तर रॅपिड ॲन्टिजनच्या ८,११५ जणांच्या नमुने तपासणीतून ५४९ जण बाधित आढळले.
सध्या उपचार घेत असलेल्या ७ हजार ८३० रुग्णांपैकी ९१६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील ७७७ जण ऑक्सिजनवर तर १३९ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील तिघांच्या मृत्यूसह १५ नवीन रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत.
चौकट
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७२६५१
उपचार घेत असलेले ७८३०
कोरोनामुक्त झालेले १६०२४८
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४५७३
बुधवारी दिवसभरात
सांगली ८९
मिरज १६
आटपाडी ४५
कडेगाव ८३
खानापूर १००
पलूस ३४
तासगाव ८४
जत ४७
कवठेमहांकाळ ४०
मिरज तालुका १२२
शिराळा १५
वाळवा ७६