जिल्ह्यात ६६८ जणांना कोरोना; १९ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:32 IST2021-08-14T04:32:34+5:302021-08-14T04:32:34+5:30
सांगली : जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णसंख्या स्थिर राहताना नवीन ६६८ रुग्णांचे निदान झाले. मृत्यूसंख्येतील वाढ कायम राहताना परजिल्ह्यातील तिघांसह ...

जिल्ह्यात ६६८ जणांना कोरोना; १९ जणांचा मृत्यू
सांगली : जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णसंख्या स्थिर राहताना नवीन ६६८ रुग्णांचे निदान झाले. मृत्यूसंख्येतील वाढ कायम राहताना परजिल्ह्यातील तिघांसह जिल्ह्यातील १६ अशा १९ जणांचा मृत्यू झाला. म्युकरमायकोसिसचा नवीन एक रुग्ण आढळला.
जिल्ह्यातील १६ जणांचा मृत्यू झाला. त्यात सांगली २, वाळवा तालुक्यातील ५, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यातील प्रत्येकी ३, खानापूर, तासगाव, शिराळा येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.
उपचार घेत असलेल्या ६२०१ रुग्णांपैकी ७६४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ६४६ जण ऑक्सिजनवर, तर ११८ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
आरोग्य यंत्रणेने आरटीपीसीआरअंतर्गत ४५१९ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ३२० जण बाधित आढळले, तर रॅपिड ॲन्टिजनच्या ७२७७ जणांच्या नमुने तपासणीतून ३५८ जण पॉझिटिव्ह आढळले. परजिल्ह्यातील तिघांचा मृत्यू, तर नवीन दहाजण उपचारास दाखल झाले.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १८४०२६
उपचार घेत असलेले ६२०९
कोरोनामुक्त झालेले १७२९८९
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४८३६
शुक्रवारी दिवसभरात
सांगली १२९
मिरज २७
आटपाडी ९४
कडेगाव ७८
खानापूर ७१
पलूस ०८
तासगाव २४
जत २९
कवठेमहांकाळ ५९
मिरज तालुका ७६
शिराळा २
वाळवा ७१