जिल्ह्यात ५७६ जणांना कोरोना; २२ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:31 IST2021-08-21T04:31:48+5:302021-08-21T04:31:48+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत शुक्रवारी पुन्हा वाढ झाली. दिवसभरात ५७६ जणांना कोरोनाचे निदान होतानाच, परजिल्ह्यातील सहाजणांसह जिल्ह्यातील १६ ...

जिल्ह्यात ५७६ जणांना कोरोना; २२ जणांचा मृत्यू
सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत शुक्रवारी पुन्हा वाढ झाली. दिवसभरात ५७६ जणांना कोरोनाचे निदान होतानाच, परजिल्ह्यातील सहाजणांसह जिल्ह्यातील १६ अशा २२ जणांचा मृत्यू झाला. ६२९ जण कोरोनामुक्त बनले, तर म्युकरमायकोसिसचा एक नवीन रुग्ण आढळला, तर एकाचा मृत्यू झाला.
जिल्ह्यातील नियंत्रणात येत असलेल्या रुग्णसंख्येतील वाढ चिंता वाढवित आहे. जिल्ह्यातील १६ जणांचा मृत्यू झाला त्यात सांगली, कुपवाडचा प्रत्येकी १, मिरज तालुक्यातील ४, आटपाडी ३, जत, वाळवा तालुक्यातील प्रत्येकी २, खानापूर, पलूस, तासगाव तालुक्यातील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.
आरोग्य विभागाने शुक्रवारी आरटीपीसीआरअंतर्गत ४४६३ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली, त्यात ३१३ जण बाधित आढळले, तर रॅपिड ॲन्टिजनच्या ६८२२ जणांच्या नमुने तपासणीतून २७६ जण पॉझिटिव्ह आढळले.
उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येत घट झाली असून सध्या ४९७१ जण उपचार घेत आहेत. त्यातील ६९७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यात ५७७ जण ऑक्सिजनवर, तर १२० जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील ६ जणांचा मृत्यू झाला, तर १३ नवे रुग्ण उपचारास दाखल झाले.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १८७६२९
उपचार घेत असलेले ४९७१
कोरोनामुक्त झालेले १७७७१३
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४९४५
शुक्रवारी दिवसभरात
सांगली ५०
मिरज २१
आटपाडी ७७
कडेगाव ६५
खानापूर १०२
पलूस ६०
तासगाव २९
जत १५
कवठेमहांकाळ ६९
मिरज तालुका ५४
शिराळा ७
वाळवा २७