जिल्ह्यात ५७५ जणांना कोरोना; १४ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:27 IST2021-08-15T04:27:52+5:302021-08-15T04:27:52+5:30

सांगली : जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना शनिवारी नवीन ५७५ रुग्ण आढळले. परजिल्ह्यातील दोघांसह जिल्ह्यातील १२, अशा ...

Corona to 575 people in the district; 14 killed | जिल्ह्यात ५७५ जणांना कोरोना; १४ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात ५७५ जणांना कोरोना; १४ जणांचा मृत्यू

सांगली : जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना शनिवारी नवीन ५७५ रुग्ण आढळले. परजिल्ह्यातील दोघांसह जिल्ह्यातील १२, अशा १४ जणांचा मृत्यू झाला. नवीन बाधितांपेक्षा ८४७ जण कोरोनामुक्त झाले, तर म्युकरमायकोसिसचे नवीन तीन रुग्ण आढळले.

जिल्ह्यातील १२ जणांचा मृत्यू झाला त्यात सांगली २, मिरज १, वाळवा तालुक्यातील ४, खानापूर, तासगाव तालुक्यातील प्रत्येकी २ आणि पलूस तालुक्यातील एकाचा समावेश आहे.

आरोग्य विभागाने शनिवारी आरटीपीसीआरअंतर्गत ४५४९ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात ३०५ जण बाधित आढळले, तर रॅपिड अँटिजनच्या ७०१९ जणांच्या नमुने तपासणीतून २८४ जण पॉझिटिव्ह आढळले.

उपचार घेत असलेल्या ७६६ रुग्णांपैकी ६४४ जण ऑक्सिजनवर तर १२२ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील दोघांचा मृत्यू तर नवीन १४ रुग्ण उपचारास दाखल झाले.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित १८४६०१

उपचार घेत असलेले ५९१७

कोरोनामुक्त झालेले १७३८३६

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४८४८

शनिवारी दिवसभरात

सांगली ७९

मिरज ६

आटपाडी १७

कडेगाव २२

खानापूर ९३

पलूस ४०

तासगाव ९५

जत ३४

कवठेमहांकाळ २०

मिरज तालुका ८७

शिराळा ११

वाळवा ७१

Web Title: Corona to 575 people in the district; 14 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.