जिल्ह्यात ३४ जणांना कोरोना; महापालिका क्षेत्रात रुग्णसंख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:24 IST2021-03-14T04:24:59+5:302021-03-14T04:24:59+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ कायम आहे. शनिवारी दिवसभरात ३४ जणांना कोरोनाचे निदान झाले असून सांगली शहरातील एकाचा ...

जिल्ह्यात ३४ जणांना कोरोना; महापालिका क्षेत्रात रुग्णसंख्येत वाढ
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ कायम आहे. शनिवारी दिवसभरात ३४ जणांना कोरोनाचे निदान झाले असून सांगली शहरातील एकाचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात रुग्णसंख्येत वाढ होत असून ३४ पैकी २० रुग्ण या भागातील आहेत. २३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
सरासरी ३० पेक्षा जादा रुग्णांची वाढ शनिवारीही कायम होती. तर, एकाचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात असली तरी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने दिवसभरात आरटीपीसीआरअंतर्गत ३३८ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली, त्यात १८ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर रॅपिड ॲण्टिजेनच्या ५४२ जणांच्या नमुना तपासणीतून १८ जणांना बाधा झाली आहे.
उपचार घेत असलेल्या ३३५ रुग्णांपैकी ३९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ३५ जण ऑक्सिजनवर तर चार जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुण्यातील दोघांना कोरोनाचे निदान झाले आहे.