जिल्ह्यात ३४ जणांना कोरोना; ४५ जण कोरोनामुक्त;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:07 IST2020-12-05T05:07:41+5:302020-12-05T05:07:41+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत गुरूवारी पुन्हा एकदा घट झाली. गेल्या दोन दिवसांपासून असलेली संख्या कमी होत, ३४ जणांना ...

जिल्ह्यात ३४ जणांना कोरोना; ४५ जण कोरोनामुक्त;
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत गुरूवारी पुन्हा एकदा घट झाली. गेल्या दोन दिवसांपासून असलेली संख्या कमी होत, ३४ जणांना कोरोनाचे निदान झाले, तर ४५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिलासादायक बाब दिवसात म्हणजे एकाही मृत्यूची नोंद नाही.
दोन दिवसांपासून सरासरी ५० च्या पटीत बाधितांची संख्या कायम होती. गुरुवारी नियमित कोराना निदान चाचण्या होऊनही बाधितांचे प्रमाण घटले आहे. महापालिका क्षेत्रात केवळ पाच नव्या रूग्णांची नोंद झाली आहे.
आरोग्य विभागाच्यावतीने आरटीपीसीआरअंतर्गत ५०४ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात १० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर रॅपिड ॲन्टिजेनच्या १६४६ जणांच्या नमुने तपासणीतून २७ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.
जिल्ह्यातील विविध रूग्णालयांत उपचार घेत असलेल्या ४०९ रूग्णांपैकी ८८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ७३ जण ऑक्सिजनवर, तर १५ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात उपचारासाठी आलेल्या सोलापूर जिल्ह्यातील दोन, तर बेळगाव जिल्ह्यातील एकास काेरोनाचे निदान झाले आहे, तर सोलापूर जिल्ह्यातील एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ४६९१२
उपचार घेत असलेले ४०९
कोरोनामुक्त झालेले ४४८०३
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७००
गुरुवारी दिवसभरात...
सांगली ३
मिरज २
आटपाडी ९
खानापूर ४
पलूस, कडेगाव, तासगाव, वाळवा प्रत्येकी ३
जत, कवठेमहांकाळ, मिरज तालुका, शिराळा प्रत्येकी १