जिल्ह्यात ३२५ जणांना कोरोना; ११ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:32 IST2021-09-04T04:32:15+5:302021-09-04T04:32:15+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत शुक्रवारी वाढ झाली. दिवसभरात ३२५ नवीन रुग्ण आढळून येतानाच ४३८ जण कोरोनामुक्त झाले. परजिल्ह्यातील ...

जिल्ह्यात ३२५ जणांना कोरोना; ११ जणांचा मृत्यू
सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत शुक्रवारी वाढ झाली. दिवसभरात ३२५ नवीन रुग्ण आढळून येतानाच ४३८ जण कोरोनामुक्त झाले. परजिल्ह्यातील एकासह जिल्ह्यातील दहाजणांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यातील दहा जणांचा मृत्यू झाला त्यात मिरज १, मिरज तालुक्यातील ३, कवठेमहांकाळ २, तर आटपाडी, जत, खानापूर आणि पलूस तालुक्यातील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.
आरोग्य विभागाने आरटीपीसीआर अंतर्गत २८०० जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात १५० जण बाधित आढळले, तर रॅपिड अँटिजनच्या ५५३२ जणांच्या नमुने तपासणीतून १८३ जण पॉझिटिव्ह आढळले.
उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येत घट झाली असून, सध्या २,८७९ जण उपचार घेत आहेत. यातील ६०३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ५०७ जण ऑक्सिजनवर, तर ९६ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातला एकाचा मृत्यू, तर नवीन ८ जण उपचारास दाखल झाले.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १,९३,३०४
उपचार घेत असलेले २,८७९
कोरोनामुक्त झालेले १,८५,३४४
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ५,०८१
शुक्रवारी दिवसभरात
सांगली २९
मिरज १०
आटपाडी ३६
कडेगाव ४०
खानापूर ३५
पलूस ११
तासगाव ५५
जत ६
कवठेमहांकाळ ३३
मिरज तालुका ५०
शिराळा २
वाळवा १८