रविवारी जिल्ह्यात नवीन १५५ रुग्ण आढळले, तर दोघांचा मृत्यू झाला. यात आटपाडी व खानापूर प्रत्येकी एकाचा समावेश आहे. दिवसभरात २०३ जण कोरोनामुक्त झाले. परजिल्ह्यातील दोघे उपचारास दाखल झाले.
सोमवारी दिवसभरात नवीन १४२ जण बाधित आढळले. मृत्यूसंख्या मात्र वाढत १० जणांचा मृत्यू झाला. यात सांगली १, आटपाडी, तासगाव आणि मिरज तालुक्यातील प्रत्येकी २, खानापूर, कवठेमहांकाळ आणि वाळवा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.
उपचार घेत असलेल्या ११०६ जणांपैकी ३९७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ३०९ जण ऑक्सिजनवर, तर ८८ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
सोमवारी आरोग्य विभागाने आरटीपीसीआर अंतर्गत २३३३ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ८७ जण बाधित आढळले, तर रॅपिड ॲन्टिजनच्या ३८३९ जणांच्या नमुने तपासणीतून ५७ जण पॉझिटिव्ह आढळले.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १९७१६०
उपचार घेत असलेले ११०६
कोरोनामुक्त झालेले १९०८३९
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ५२१५
सोमवारी दिवसभरात
सांगली १०
मिरज ३
आटपाडी २१
कडेगाव १३
खानापूर ३०
पलूस ८
तासगाव २४
जत ८
कवठेमहांकाळ ३
मिरज तालुका ९
शिराळा ४
वाळवा ९