जिल्ह्यात २८४ जणांना कोरोना; चौघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:28 IST2021-04-02T04:28:22+5:302021-04-02T04:28:22+5:30
गेल्या पाच दिवसांपासून रोज किमान चार जणांचा कोरोनाने मृत्यू होत आहे. तर गेल्या पाच महिन्यातील सर्वाधिक आकडेवारीही गुरूवारी नोंदली ...

जिल्ह्यात २८४ जणांना कोरोना; चौघांचा मृत्यू
गेल्या पाच दिवसांपासून रोज किमान चार जणांचा कोरोनाने मृत्यू होत आहे. तर गेल्या पाच महिन्यातील सर्वाधिक आकडेवारीही गुरूवारी नोंदली गेली आहे. तासगाव, पलूस, मिरज आणि वाळवा तालुक्यातील चार जणांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाच्यावतीने गुरूवारी आरटीपीसीआर अंतर्गत १०५५ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात १७९ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे. तर रॅपिड अँटिजेनच्या १२८४ जणांच्या चाचण्यांतून ११८ जण बाधित आढळले आहेत.
उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ होत असून सध्या २२६१ जण उपचार घेत आहेत त्यातील १८८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील १७४ जण ऑक्सिजनवर तर १४ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यातील ९ ग्रामीण रुग्णालयात पुन्हा एकदा उपचार सुरू करण्यात आले आहेत. सध्या १८०२ जण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ५१९३४
उपचार घेत असलेले २२६१
कोरोनामुक्त झालेेले ४७८६९
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १८०४
गुरुवारी दिवसभरात
सांगली ५४
मिरज ३८
वाळवा ४१
आटपाडी २९
खानापूर २८
मिरज तालुका १९
शिराळा १८
कवठेमहांकाळ १७
जत १५
पलूस ९
तासगाव ६