जिल्ह्यात २७६ जणांना कोरोना; २२० जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:23 IST2021-04-03T04:23:30+5:302021-04-03T04:23:30+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढ शुक्रवारीही कायम होती. दिवसभरात २७६ जणांना कोरोनाचे निदान होतानाच काहीसा दिलासा मिळत २२० जण ...

जिल्ह्यात २७६ जणांना कोरोना; २२० जण कोरोनामुक्त
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढ शुक्रवारीही कायम होती. दिवसभरात २७६ जणांना कोरोनाचे निदान होतानाच काहीसा दिलासा मिळत २२० जण कोरोनामुक्त झाले आहेत. सांगली शहरासह वाळवा तालुक्यातील दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती अधिक चिंताजनक होत असून रुग्णसंख्येतील वाढ कायम आहे. महापालिका क्षेत्रात ६८ तर वाळवा तालुक्यात ४७, कडेगाव तालुक्यात ४६ रुग्ण आढळले आहेत. खानापूर तालुक्यातही मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत.
आरोग्य यंत्रणेच्या वतीने शुक्रवारी दिवसभरात आरटीपीसीआर अंतर्गत १०१६ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली, त्यात १६५ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत तर रॅपिड अँटिजेनच्या ९१५ चाचण्यांमधून ११७ जणांना बाधा झाली आहे.
सध्या २३१४ जण उपचार घेत असून त्यातील २०१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यात १९३ जण ऑक्सिजनवर तर १८ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ५२२१०
उपचार घेत असलेले २०१
कोरोनामुक्त झालेले ४८०९०
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १८०६
शुक्रवारी दिवसभरात
सांगली ४७
मिरज २१
वाळवा ४७
कडेगाव ४६
खानापूर २५
जत २४
तासगाव १८
मिरज तालुका १६
आटपाडी १२
पलूस १०
शिराळा ७
कवठेमहांकाळ ३