जिल्ह्यात २३ जणांना कोरोना; १३ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:29 IST2021-01-08T05:29:17+5:302021-01-08T05:29:17+5:30

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत बुधवारी घट होत, २३ जण पॉझिटिव्ह आढळले, तर दिवसभरात १३ जण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात ...

Corona to 23 in the district; 13 corona free | जिल्ह्यात २३ जणांना कोरोना; १३ जण कोरोनामुक्त

जिल्ह्यात २३ जणांना कोरोना; १३ जण कोरोनामुक्त

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत बुधवारी घट होत, २३ जण पॉझिटिव्ह आढळले, तर दिवसभरात १३ जण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.

या आठवड्यात दररोज सरासरी २० जणांना कोरोनाचे निदान होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचा उतार कायम आहे. बुधवारी मिरज शहरासह जिल्ह्यातील कडेगाव, कवठेमहांकाळ, मिरज, शिराळा, पलूस आणि तासगाव तालुक्यात एकही नवा रुग्ण आढळला नाही.

आरोग्य यंत्रणेने बुधवारी आरटीपीसीआरअंतर्गत १२४ नमुन्यांची चाचणी घेतली. त्यात १२ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे, तर रॅपिड ॲन्टिजेनच्या ८५३ चाचण्यांमधून १२ पॉझिटिव्ह आढळले आहेत.

जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या २१२ रुग्णांपैकी ४० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यात ३४ जण ऑक्सिजनवर, तर ६ व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. सातारा जिल्ह्यातील एकास कोराेनाचे निदान झाले आहे.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित ४७७११

उपचार घेत असलेले २१२

कोरोनामुक्त झालेले ४५७६४

आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७३५

बुधवारी दिवसभरात

सांगली ८

जत ६

खानापूर, आटपाडी प्रत्येकी ४

वाळवा १

Web Title: Corona to 23 in the district; 13 corona free