जिल्ह्यात १८ जणांना कोरोना; १३ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:29 IST2021-01-08T05:29:11+5:302021-01-08T05:29:11+5:30

रविवारी पाच महिन्यांतील सर्वांत कमी ११ बाधितांची नोंद झाली हाती. त्यानंतर सोमवारी त्यात वाढ होत १८ बाधीत आढळले आहेत. ...

Corona to 18 in the district; 13 corona free | जिल्ह्यात १८ जणांना कोरोना; १३ जण कोरोनामुक्त

जिल्ह्यात १८ जणांना कोरोना; १३ जण कोरोनामुक्त

रविवारी पाच महिन्यांतील सर्वांत कमी ११ बाधितांची नोंद झाली हाती. त्यानंतर सोमवारी त्यात वाढ होत १८ बाधीत आढळले आहेत. कडेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला असला तरी महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील इतर भागांत दिलासादायक चित्र आहे. कडेगाव, पलूस व मिरज तालुक्यांत एकाही नव्या रुग्णाची नोंद झालेली नाही.

आरोग्य विभागाच्यावतीने सोमवारी आरटीपीसीआर अंतर्गत १५५ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात ५ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे तर रॅपिड ॲन्टिजेनच्या ९४१ चाचण्यांमधून १३ जण बाधित आढळले आहेत.

जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या १८८ रुग्णांपैकी ३९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यात ३१ जण ऑक्सिजनवर तर ८ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

चाैकट

आतापर्यंतचे एकूण बाधीत ४७६५६

उपचार घेत असलेले १८८

कोरोनामुक्त झालेले ४५७३३

आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७३५

सोमवारी दिवसभरात

सांगली ४

जत ५

खानापूर, शिराळा, तासगाव प्रत्येकी २

आटपाडी, वाळवा प्रत्येकी १

Web Title: Corona to 18 in the district; 13 corona free