जिल्ह्यात १७२ जणांना कोरोना; सात जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:27 IST2021-09-19T04:27:02+5:302021-09-19T04:27:02+5:30

सांगली : जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णसंख्येत शनिवारी काहीशी वाढ होत, नवीन १७२ जणांना कोरोनाचे निदान झाले. परजिल्ह्यातील एकासह जिल्ह्यातील ...

Corona to 172 people in the district; Seven people died | जिल्ह्यात १७२ जणांना कोरोना; सात जणांचा मृत्यू

जिल्ह्यात १७२ जणांना कोरोना; सात जणांचा मृत्यू

सांगली : जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णसंख्येत शनिवारी काहीशी वाढ होत, नवीन १७२ जणांना कोरोनाचे निदान झाले. परजिल्ह्यातील एकासह जिल्ह्यातील ६, अशा ७ जणांचा मृत्यू झाला. १९० जण कोरोनामुक्त झाले.

जिल्ह्यातील ६ जणांचा मृत्यू झाला. त्यात सांगली १, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रत्येकी २ आणि वाळवा तालुक्यातील एकाचा समावेश आहे.

आरोग्य विभागाने शनिवारी आरटीपीसीआरअंतर्गत १४३५ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ७५ जण बाधित आढळले, तर रॅपिड अँटिजनच्या ४३९१ जणांच्या नमुने तपासणीतून १०५ जणांना कोरोनाचे निदान झाले.

उपचार घेत असलेल्या ११९६ जणांपैकी ४०९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ३३१ जण ऑक्सिजनवर, तर ७८ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील एकाचा मृत्यू, तर नवीन ८ जण उपचारास दाखल झाले.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित १९६८६३

उपचार घेत असलेले ११९६

कोरोनामुक्त झालेले १९०४६४

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ५२०३

शनिवारी दिवसभरात

सांगली १८

मिरज ७

आटपाडी १५

कडेगाव ९

खानापूर २५

पलूस ३

तासगाव ३०

जत १३

कवठेमहांकाळ १३

मिरज तालुका १७

शिराळा ३

वाळवा १९

Web Title: Corona to 172 people in the district; Seven people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.