जिल्ह्यात १६ जणांना कोरोना; दाेघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:24 IST2021-01-18T04:24:32+5:302021-01-18T04:24:32+5:30
सांगली : जिल्ह्यात रविवारी १६ जणांना कोरोनाचे निदान झाले. शनिवारी गेल्या सहा महिन्यातील सर्वात कमी बाधितांची नोंद झाल्याने दिलासा ...

जिल्ह्यात १६ जणांना कोरोना; दाेघांचा मृत्यू
सांगली : जिल्ह्यात रविवारी १६ जणांना कोरोनाचे निदान झाले. शनिवारी गेल्या सहा महिन्यातील सर्वात कमी बाधितांची नोंद झाल्याने दिलासा मिळाला होता. यात रविवारी किंचित वाढ झाली, तर जत आणि मिरज तालुक्यातील दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला. दिवसभरात २४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोना बाधितांची संख्या मर्यादीत राहात असतानाच बरे होणाऱ्याचेही प्रमाण वाढत आहे. रविवारी जिल्ह्यातील आटपाडी, मिरज, शिराळा, वाळवा, पलूस आणि तासगाव तालुक्यात एकाही नव्या रुग्णाची नोंद झाली नाही.
आरोग्य विभागाच्यावतीने शनिवारी घेण्यात आलेल्या आरटीपीसीआरअंतर्गत ३३६ नमुन्यांची चाचणी घेतली. यातील १४ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर रॅपिड ॲन्टिजेनच्या ४०० चाचण्यांमधून ७ जणांना बाधा झाली आहे.
उपचार घेत असलेल्या १९६ रुग्णांपैकी ३६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २९ जण ऑक्सिजनवर, तर सातजण व्हेंटीलेटरवर उपचार घेत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील ४, तर बेळगाव जिल्ह्यातील एकास कोरोनाचे निदान झाले आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ४७९२३
उपचार घेत असलेले १९६
कोरोनामुक्त झालेले ४५९८२
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७४५
रविवारी दिवसभरात
सांगली ९
मिरज २
आटपाडी ०
जत १
कडेगाव १
कवठेमहांकाळ २
खानापूर १
मिरज ०
पलूस ०
शिराळा ०
तासगाव ०
वाळवा ०