जिल्ह्यात १५९४ जणांना कोरोना; ४५ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:28 IST2021-05-13T04:28:04+5:302021-05-13T04:28:04+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत बुधवारी पुन्हा वाढ झाली. तीन दिवसांपासून सरासरी १३००वर असणारी रुग्णसंख्या वाढून १५९४ झाली आहे. ...

जिल्ह्यात १५९४ जणांना कोरोना; ४५ जणांचा मृत्यू
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत बुधवारी पुन्हा वाढ झाली. तीन दिवसांपासून सरासरी १३००वर असणारी रुग्णसंख्या वाढून १५९४ झाली आहे. परजिल्ह्यातील १०, तर जिल्ह्यातील ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १२९९ जण कोरोनामु्क्त झाले आहेत.गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यातील बाधितांची संख्या घटली होती. त्यात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचेही प्रमाण वाढले होते. बुधवारी पुन्हा बाधित वाढले आहेत. जिल्ह्यात ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. यात सांगली, मिरज, आटपाडी प्रत्येकी एक, वाळवा ८, खानापूर ७, कडेगाव, मिरज, तासगाव प्रत्येकी ४, पलुस ३, जत २ आदींचा समावेश आहे.
उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १७ हजार ३३१ झाली असून, त्यातील २५५७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २२८७ जण ऑक्सिजनवर, तर २७० रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील दहा जणांचा मृत्यू झाला असून, ९६ नवे रुग्ण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ९५,०५९
उपचार घेत असलेले १७,३३१
कोरोनामुक्त झालेले ७४,९८६
आतापर्यंतचे एकूण मृत्यू २४७२
बुधवारी दिवसभरात
सांगली १००
मिरज ६७
जत २९०
मिरज तालुका २२०
वाळवा १९५
तासगाव १७०
खानापूर १६८
कवठेमहांकाळ ११८
शिराळा ७५
कडेगाव ७३
आटपाडी ७०
पलूस ४८