जिल्ह्यात १५१ जणांना कोरोना; १३ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:29 IST2021-09-18T04:29:40+5:302021-09-18T04:29:40+5:30
सांगली : जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णसंख्येत शुक्रवारी घट होताना, नवीन १५१ रुग्ण आढळले. वाढती मृत्युसंख्या मात्र, कायम राहताना परजिल्ह्यातील ...

जिल्ह्यात १५१ जणांना कोरोना; १३ जणांचा मृत्यू
सांगली : जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णसंख्येत शुक्रवारी घट होताना, नवीन १५१ रुग्ण आढळले. वाढती मृत्युसंख्या मात्र, कायम राहताना परजिल्ह्यातील दोघांसह जिल्ह्यातील ११ अशा १३ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात २४८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यातील ११ जणांचा मृत्यू झाला. सलग दुसऱ्या दिवशी दहापेक्षा जास्त मृत्यूची नोंद झाली. त्यात मिरज १, खानापूर, आटपाडी तालुक्यातील पत्येकी २, कडेगाव, पलूस, तासगाव, जत, कवठेमहांकाळ आणि शिराळा तालुक्यातील प्रत्येकीि एकाचा मृत्यू झाला.
आरोग्य यंत्रणांनी आरटीपीसीआर अंतर्गत २४५० जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात ५८ जणांना कोरोनाचे निदान झाले, तर रॅपिड ॲन्टिजनच्या ४१८७ जणांच्या नमुने तपासणीतून १०३ जण बाधित आढळले.
जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या १२२० जणांपैकी ४३८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ३४५ जण ऑक्सिजनवर, तर ९३ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील दोघांचा मृत्यू, तर नवीन दहा रुग्ण उपचारास दाखल झाले.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १९६६९१
उपचार घेत असलेले १२२०
कोराेनामुक्त झालेले १९०२७४
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ५१९७
शुक्रवारी दिवसभरात
सांगली २३
मिरज १०
आटपाडी १९
कडेगाव १६
खानापूर २८
पलूस ६
तासगाव १६
जत १०
कवठेमहांकाळ ११
मिरज तालुका ७
वाळवा ५