जिल्ह्यात १४३४ जणांना कोरोना; १३७६ जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:25 IST2021-05-22T04:25:43+5:302021-05-22T04:25:43+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येतील स्थिरता शुक्रवारीही कायम होती. शुक्रवारी दिवसभरात १४३४ जणांना कोरोनाचे निदान झाले, तर १३७६ जण ...

जिल्ह्यात १४३४ जणांना कोरोना; १३७६ जण कोरोनामुक्त
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येतील स्थिरता शुक्रवारीही कायम होती. शुक्रवारी दिवसभरात १४३४ जणांना कोरोनाचे निदान झाले, तर १३७६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात परजिल्ह्यातील आठ जणांसह जिल्ह्यातील ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रापेक्षा वाळवा, जत तालुक्यांतील रुग्णांची संख्या अधिक आहे.
गेल्या पाच दिवसांपासून सरासरी तेराशे रुग्णांची नोंद होत आहे. यात वाढ होत १४३४ जण बाधित आढळले असले तरी तुलनेने संख्या स्थिर आहे. जिल्ह्यातील ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. यात सांगली, मिरज प्रत्येकी दोन, वाळवा व पलूस तालुक्यांत प्रत्येकी सात, खानापूर सहा, मिरज तीन, जत, शिराळा प्रत्येकी दोन, आटपाडी, कडेगाव, कवठेमहांकाळ तालुक्यांत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाने शुक्रवारी आरटीपीसीआर अंतर्गत ३३४९ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ७४६ जण बाधित आढळले, तर ४१२५ जणांच्या रॅपिड अँटिजनच्या तपासणीतून ७६५ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.
जिल्ह्यातील रुग्णालयात व होम आयसोलेशनमध्ये १३ हजार ८७६ जण उपचार घेत असून, त्यातील २३३३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २०४० जण ऑक्सिजनवर, तर २९३ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील आठजणांचा मृत्यू झाला असून, नवीन ७७ जण उपचारांसाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
चौकट -
सांगली १०२
मिरज ६७
वाळवा २५०
जत २३०
तासगाव १६२
मिरज तालुका १५५
शिराळा १२५
कडेगाव ८८
खानापूर ८५
पलूस ६८
आटपाडी ५८
कवठेमहांकाळ ४४