जिल्ह्यात १३५३ जणांना कोरोना; ४२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:26 IST2021-05-23T04:26:33+5:302021-05-23T04:26:33+5:30

कोरोनाबाधितांच्या संख्येत शुक्रवारी वाढ झाली होती. शनिवारी पुन्हा बाधितांची व मृत्यूचीही संख्या घटली आहे. जिल्ह्यात ३३ जणांचा मृत्यू झाला ...

Corona to 1353 people in the district; 42 killed | जिल्ह्यात १३५३ जणांना कोरोना; ४२ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात १३५३ जणांना कोरोना; ४२ जणांचा मृत्यू

कोरोनाबाधितांच्या संख्येत शुक्रवारी वाढ झाली होती. शनिवारी पुन्हा बाधितांची व मृत्यूचीही संख्या घटली आहे. जिल्ह्यात ३३ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात सांगली २, मिरज ३, वाळवा ८, मिरज तालुका ६, पलूस ५, कवठेमहांकाळ ४, खानापूर, तासगाव प्रत्येकी २ आणि आटपाडी, जत तालुक्यातील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील विविध रुग्णालयात व होम आयसोलेशनमधील रुग्णांची संख्या १३ हजार ८६७ झाली असून, त्यातील २२७३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील १९९६ जण ऑक्सिजनवर, तर २७७ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

आरोग्य विभागाच्यावतीने शनिवारी आरटीपीसीआर अंतर्गत २५८९ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली, त्यात ६३३ जण पॉझिटिव्ह आढळले, तर रॅपिड अँटिजनच्या ३६७९ जणांच्या तपासणीतून ७९५ जण बाधित आढळले आहेत. परजिल्ह्यातील नऊ जणांचा मृत्यू झाला असून, ७५ नवीन रुग्ण उपचारांसाठी सांगली जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

चौकट-

आतापर्यंतचे एकूण बाधित १०८२९८

उपचार घेत असलेले १३८६७

कोरोनामुक्त झालेले ९१२८३

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ३१४८

शनिवारी दिवसभरात

सांगली १३९

मिरज ६१

मिरज तालुका १७१

जत, वाळवा प्रत्येकी १७०

कवठेमहांकाळ १०६

तासगाव १०४

खानापूर १०३

कडेगाव १००

आटपाडी ९४

शिराळा ७२

पलूस ६३

Web Title: Corona to 1353 people in the district; 42 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.