जिल्ह्यात १०५ जणांना कोरोना; १२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:31 IST2021-09-24T04:31:41+5:302021-09-24T04:31:41+5:30

सांगली : जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णसंख्येत घट होताना गुरुवारी १०५ नवीन रुग्ण आढळले. जिल्ह्यातील मृत्यूसंख्येत मात्र वाढ होताना १२ ...

Corona to 105 people in the district; 12 killed | जिल्ह्यात १०५ जणांना कोरोना; १२ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात १०५ जणांना कोरोना; १२ जणांचा मृत्यू

सांगली : जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णसंख्येत घट होताना गुरुवारी १०५ नवीन रुग्ण आढळले. जिल्ह्यातील मृत्यूसंख्येत मात्र वाढ होताना १२ जणांचा मृत्यू झाला, तर १६३ जण कोरोनामुक्त झाले.

जिल्ह्यातील १२ जणांचा मृत्यू झाला त्यात सांगली १, मिरज २, खानापूर, जत तालुक्यातील प्रत्येकी २, आटपाडी, पलूस, कवठेमहांकाळ आणि शिराळा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

गुरुवारी आरटीपीसीआर अंतर्गत २,५९६ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली त्यात ६८ जण पॉझिटिव्ह आढळले. तर रॅपिड ॲन्टिजनच्या ३८०९ जणांच्या नमुने तपासणीतून ४१ जण बाधित आढळले.

उपचार घेत असलेल्या ९३१ जणांपैकी ३५० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २७७ जण ऑक्सिजनवर तर ७३ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील ४ जण उपचारास दाखल झाले.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित १,९७,५४८

उपचार घेत असलेले ९३१

कोराेनामुक्त झालेले १,९१,३७७

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ५,२४०

Web Title: Corona to 105 people in the district; 12 killed