जिल्ह्यात १० जणांना कोरोना; २० जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:28 IST2021-01-19T04:28:53+5:302021-01-19T04:28:53+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाला लागलेला उतार सोमवारीही कायम होता. सर्वात कमी १० बाधितांची नाेंद होतानाच २० जणांनी कोरानावर मात ...

जिल्ह्यात १० जणांना कोरोना; २० जण कोरोनामुक्त
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाला लागलेला उतार सोमवारीही कायम होता. सर्वात कमी १० बाधितांची नाेंद होतानाच २० जणांनी कोरानावर मात केली आहे, तर दिवसभरात कोरोनाने एकाचाही मृत्यू झाला नसल्याने दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील कोरोनामुक्तांच्या संख्येने सोमवारी ४६ हजारांचा टप्पा पार केला.
जिल्ह्यात सर्वात कमी १० बाधितांची नोंद गेल्या आठवड्यात झाली होती. सोमवारीही १० जणांना कोरोनाचे निदान झाले, तर एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यात आटपाडी, मिरज, शिराळा आणि पलूस तालुक्यांसह महापालिका क्षेत्रात एकाही नव्या बाधिताची नोंद झाली नाही.
आरोग्य विभागाच्यावतीने सोमवारी आरटीपीसीआरअंतर्गत १२७ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात एकाला कोरोनाचे निदान झाले, तर रॅपिड ॲन्टिजेनच्या ६९१ जणांच्या तपासणीतून ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
जिल्ह्यातील सहा रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या १८६ रुग्णांपैकी २९ जण ऑक्सिजनवर, तर तिघेजण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. सातारा जिल्ह्यातील दोघांना कोरोनाचे निदान झाले आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ४७९३३
उपचार घेत असलेले १८६
कोरोनामुक्त झालेले ४६००२
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७४५
सोमवारी दिवसभरात....
सांगली ०
मिरज ०
आटपाडी ०
जत २
कडेगाव १
कवठेमहांकाळ १
खानापूर ०
मिरज तालुका ०
पलूस ०
शिराळा ०
तासगाव १
वाळवा ०