विट्यात विनामास्क फिरणाऱ्यांची रस्त्यावरच केली कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 11:21 AM2021-04-17T11:21:06+5:302021-04-17T11:24:14+5:30

CoronaVirus Sangli : राज्य शासनाने लॉकडाऊनचे निर्बंध कडक करीत संचारबंदी लागू केली असतानाही विटा शहरासह तालुक्यात शासनाच्या नियमांचे उल्लंघन करीत मास्क न लावता विनाकारण फिरणाऱ्यांची प्रशासनाने रस्त्यावरच सापडेल त्या जागीच कोरोना चाचणी करण्यात सुरूवात केली आहे. त्यासाठी प्रशासन आक्रमक झाले असून कारवाईसाठी रस्त्यावर उतरले आहे. त्यामुळे विटा शहरासह संपूर्ण तालुका हादरला आहे.

Corolla testing of unmasked pedestrians on the road | विट्यात विनामास्क फिरणाऱ्यांची रस्त्यावरच केली कोरोना चाचणी

विट्यात विनामास्क फिरणाऱ्यांची रस्त्यावरच केली कोरोना चाचणी

Next
ठळक मुद्देविट्यात विनामास्क फिरणाऱ्यांची रस्त्यावरच केली कोरोना चाचणीप्रशासनाची धडक मोहिम : विटा शहरासह तालुका हादरला

विटा : राज्य शासनाने लॉकडाऊनचे निर्बंध कडक करीत संचारबंदी लागू केली असतानाही विटा शहरासह तालुक्यात शासनाच्या नियमांचे उल्लंघन करीत मास्क न लावता विनाकारण फिरणाऱ्यांची प्रशासनाने रस्त्यावरच सापडेल त्या जागीच कोरोना चाचणी करण्यात सुरूवात केली आहे. त्यासाठी प्रशासन आक्रमक झाले असून कारवाईसाठी रस्त्यावर उतरले आहे. त्यामुळे विटा शहरासह संपूर्ण तालुका हादरला आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने दि. १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजलेपासून संचारबंदी लागू केली आहे. सध्या सर्वत्र कोरोना संसर्गाने हाहाकार उडाला असून रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

विटा शहरासह तालुक्यात रूग्णांची संख्या वाढत असतानाही अनेक नागरीक विना मास्कचे शहरात फिरत आहेत. गुरूवारी पहिल्या दिवशीच विटा शहरात संचारबंदीचा फज्जा उडाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा शुक्रवारी खडबडून जागी झाली आहे. प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषीकेत शेळके, पोलीस उपअधिक्षक अंकुश इंगळे, पोलीस निरीक्षक संतोष डोके, मुख्याधिकारी अतुल पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल लोखंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल नलवडे यांच्यासह पथकाने शुक्रवारी विटा शहरातील छत्रपती शिवाजी चौकात येऊन कारवाईचा बडगा उगारला.

यावेळी या पथकाने विनामास्क व विनाकारण रस्त्यावरून फिरणाºया लोकांची चौकशी केली. त्यावेळी त्यातील अनेकांची तातडीने कोरोनाची सक्तीने अ‍ॅन्टीजन चाचणी घेतली. तर काही दुचाकीस्वारांच्या दुचाकी जप्त केल्या. यावेळी संचारबंदीचे उल्लंघन करून विनाकारण मुक्त संचार करणाºयांवरही कारवाई केली. त्यामुळे अनेक नागरीकांचे चांगलेच धाबे दणाणले.

या पथकाने पुन्हा तेथून नागेवाडी येथे जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी तेथेही काही नागरीक विनामास्क फिरताना आढळून आले. त्यांचीही या पथकाने सक्तीने कोरोना चाचणी घेतली. या चाचणीत पॉझिटिव्ह आढळणाऱ्या रूग्णांना विटा येथील कोवीड रूग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे या पथकाची कारवाई पाहून अनेकांनी घरातच राहण्याचे पसंत केले.

विटा शहरासह खानापूर तालुक्यात संचारबंदीचे उल्लंघन करून विनाकारण मोकाट फिरणाºयांवर प्रशासनाने कारवाईची मोहीम सुरू केली आहे. शुक्रवारी विनामास्क फिरणाऱ्या अनेकांची रस्त्यातच अ‍ॅन्टीजन चाचणी घेतली असून त्यात पॉझिटिव्ह अहवाल आल्यास त्याला कोवीड रूग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. नागेवाडी येथे होम आयशोलेशन असलेल्या रूग्णांच्या घरीही भेटी देऊन त्यांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रशासनाने पोलीसांच्या मदतीने ही मोहीम सुरू केली असल्याचे तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी सांगितले.

Web Title: Corolla testing of unmasked pedestrians on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.