लिंगायत समाजास सर्वतोपरी सहकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:30 IST2021-03-01T04:30:04+5:302021-03-01T04:30:04+5:30

फोटो ओळ : आष्टा येथील लिंगायत समाज वधूवर मेळावा उद्घाटन प्रसंगी वैभव शिंदे, झुंजारराव पाटील, संग्राम कुंभार, वैभव सांभारे, ...

Cooperation to the Lingayat community | लिंगायत समाजास सर्वतोपरी सहकार्य

लिंगायत समाजास सर्वतोपरी सहकार्य

फोटो ओळ : आष्टा येथील लिंगायत समाज वधूवर मेळावा उद्घाटन प्रसंगी वैभव शिंदे, झुंजारराव पाटील, संग्राम कुंभार, वैभव सांभारे, मोहनराव आजमने, विजय बेनाडीकर, अतुल महाजन उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : आष्टा शहरात लिंगायत समाजाने धार्मिक व सामाजिक, सहकार, राजकीय क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली आहे. शहराच्या विकासात समाजाने मोलाचे योगदान दिले आहे. समाजाच्या विकासकामांना पालिकेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन राजाराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वैभव शिंदे यांनी केले.

येथील विलासराव शिंदे विद्यालयात आयोजित लिंगायत समाज वधूवर मेळावा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, वारणा बझारचे संचालक मोहनराव आजमने, प्रकाश खंचनाळे, वैभव सांभारे, सुरेश शेटे, महेश चौगुले, जयगोंड कोरे, सुरेंद्र शिराळकर, प्रतीक केडगे, संग्राम कुंभार प्रमुख उपस्थित होते.

विजय बेनाडीकर यांनी स्वागत, वैभव सांभारे यांनी प्रास्ताविक, सचिन कोरे यांनी सूत्रसंचालन केले. अतुल महाजन यांनी आभार मानले. यावेळी आष्टा परिसरातील सर्व समाजबांधव उपस्थित होते.

Web Title: Cooperation to the Lingayat community