‘कृष्णा’च्या निकालावर उलट-सुलट चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:19 IST2021-07-01T04:19:22+5:302021-07-01T04:19:22+5:30
इस्लामपूर : कृष्णा साखर कारखान्याच्या मतदानानंतर तिन्ही पॅनेलच्या उमेदवारांनी विजयाचे दावे केले आहेत. यंदा मतदानाचा टक्का वाढल्यामुळे जास्त मतदान ...

‘कृष्णा’च्या निकालावर उलट-सुलट चर्चा
इस्लामपूर : कृष्णा साखर कारखान्याच्या मतदानानंतर तिन्ही पॅनेलच्या उमेदवारांनी विजयाचे दावे केले आहेत. यंदा मतदानाचा टक्का वाढल्यामुळे जास्त मतदान असलेल्या गावांतील उमेदवारांनी आपल्या गावातील इतर उमेदवारांना सावरून घेतल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे पॅनेल टू पॅनेल निकाल लागेल का, याबाबत साशंकता आहे.
मंगळवार, दि. २९ रोजी मतदानावेळी सर्व केंद्रांवर खेळीमेळीचे वातावरण होते. निवडणुकीत तिन्ही पॅनेलचे एकूण ६३ आणि ३ अपक्ष असे ६६ उमेदवार आहेत. नेर्ले, तांबवे, रेठरे हरणाक्ष, बोरगाव, देवराष्ट्रे आणि इस्लामपूर येथे तिन्ही पॅनेलचे उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नेतृत्व मानणाऱ्यांचा त्यात भरणा आहे. त्यामुळे मतदान केंद्रांवर छुप्या पद्धतीने ‘क्राॅस व्होटिंग’ झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे नेमके कोणाचे पॅनेल विजयी होईल, याबाबत राजकीय वर्तुळातून ठोस अंदाज व्यक्त केला जात नाही.
नेर्ले-तांबवे, बोरगाव-रेठरे हरणाक्ष, येडेमच्छिंद्र-वांगी या तिन्ही गटामधील सर्वच उमेदवार निवडून येण्याचा दावा करीत आहेत. त्यामुळे या निकालाबाबत तिन्ही गटांतून उलट-सुलट चर्चा सुरू आहे. काही ठिकाणी निकालाआधीच जेवणावळी पार पडल्या आहेत.