मिरजेच्या पोलीस ठाण्यात वादावादी
By Admin | Updated: March 20, 2015 23:17 IST2015-03-20T22:45:44+5:302015-03-20T23:17:33+5:30
मारहाणीची तक्रार : माजी पं. स. सदस्याचा प्रताप

मिरजेच्या पोलीस ठाण्यात वादावादी
मिरज : पोलिसांनी मुलास अटक केल्यानंतर माजी पंचायत समिती सदस्य सत्याप्पा नाईक व मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक देवीदास सोनवणे यांच्यात आज (शुक्रवारी) बाचाबाची व हमरीतुमरी झाली. पोलिसांनी मुलास बेदम मारहाण करून पैशाची मागणी केल्याची तक्रार नाईक यांनी केली.गुरुवारी रात्री वड्डीत वाळूच्या ट्रकचा धक्का लागल्याने मंदिराच्या कट्ट्याचे नुकसान झाले. सत्याप्पा नाईक यांचा मुलगा व मदनभाऊ युवा मंचचा अध्यक्ष प्रदीप नाईक याने कट्टा पाडल्याचा जाब विचारल्याने प्रकाश सुतार याच्यासोबत मारामारी झाली. या प्रकाराबाबत दोघांनी पोलीस ठाण्यात परस्पराविरोधात तक्रारी दिल्यानंतर प्रदीप सुतार, बबन कोळी व प्रकाश सुतार यांना प्रतिबंधात्मक कारवाईखाली अटक करण्यात आली. आज सकाळी पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी मुलगा प्रदीप यास मारहाण केल्याची तक्रार करीत सत्याप्पा नाईक यांनी पोलीस ठाण्यात जाऊन सोनवणे यांना जाब विचारला. यावेळी दोघांत बाचाबाची, हमरीतुमरी झाली. या घटनेबाबत तक्रार नसल्याचे व प्रकरण सामंजस्याने मिटल्याचे सत्याप्पा नाईक यांच्याकडून लिहून घेऊन व्हिडिओ चित्रणही केले. पोलिसांनी पैशाची मागणी केली व बेदम मारहाणीमुळे मुलगा प्रदीप याच्या हातास इजा झाल्याने सोनवणे यांच्याविरूध्द पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करणार असल्याचेही नाईक यांनी सांगितले. (वार्ताहर)
पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करणार
पोलिसांनी पैशाची मागणी केली व बेदम मारहाणीमुळे मुलगा प्रदीप याच्या हातास इजा झाल्याने सोनवणे यांच्याविरूध्द पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करणार असल्याचेही सत्याप्पा नाईक यांनी सांगितले.
मारहाणीच्या तक्रारीचे प्रकरण मिटविण्यासाठी काहींनी प्रयत्न सुरू केले होते.