मिरजेत कॅसिनो जुगारात पैसे हरल्याने तरुणांच्या गटात वादावादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:29 IST2021-09-18T04:29:18+5:302021-09-18T04:29:18+5:30
रेल्वेस्थानक परिसरात व्हिडीओ गेम, कॅसिनो जुगारात पैसे हरलेल्या काही तरुणांनी कॅसिनो जुगारात पैसे हरल्याने चालकास चांगलेच धारेवर धरले. ...

मिरजेत कॅसिनो जुगारात पैसे हरल्याने तरुणांच्या गटात वादावादी
रेल्वेस्थानक परिसरात व्हिडीओ गेम, कॅसिनो जुगारात पैसे हरलेल्या काही तरुणांनी कॅसिनो जुगारात पैसे हरल्याने चालकास चांगलेच धारेवर धरले. तरुणांच्या व कॅसिनो चालकाची जोरदार वादावादीचा प्रकार घडला. व्हिडीओ गेम व कॅसिनोच्या यंत्रात बिघाड करून जुगार खेळणाऱ्यांची लूटमार सुरू असल्याचा आरोप करत तरुणांनी पैसे परत मागितले. यावेळी चालकाने पैसे परत देण्यास नकार देत काही जणांना पाचारण केल्याने प्रकरण हातघाइला पोहोचले. काही जणांनी मध्यस्ती करून कंपनीला दोष देत हरलेले पैसे परत देऊन प्रकरण मिटविल्याची माहिती मिळाली. मिरजेत रेल्वेस्थानक व बसस्थानक परिसरात बेकायदा सुरू आलेल्या कॅसिनो, व्हिडीओ पार्लर व ऑनलाईन लॉटरी जुगारात तरुणांची फसवणूक सुरू असल्याची तक्रार आहे.
मिरज शहर व ग्रामीण भागात बेकायदा व्हिडीओ पार्लर व कॅसिनो सुरू आहेत. येथे तरुण व शाळकरी मुलांचा वावर आहे. यंत्रात बिघाड करण्यात येत असल्याने जुगाराची रक्कम हरल्यानंतर वारंवार वादावादी व हाणामारीचे प्रकार सुरू आहेत. बेकायदा व्हिडिओ व कॅसिनो बंद करण्याची नागरिकांची मागणी आहे.