कुपवाडमध्ये अतिक्रमणे काढताना वादावादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:27 IST2021-02-05T07:27:02+5:302021-02-05T07:27:02+5:30

कुपवाड : शहरातील एमआयडीसीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील व्यावसायिक, हातगाडी, छपऱ्या, मोठे शेड अशा तेवीस अतिक्रमणांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी ...

Controversial while removing encroachments in Kupwad | कुपवाडमध्ये अतिक्रमणे काढताना वादावादी

कुपवाडमध्ये अतिक्रमणे काढताना वादावादी

कुपवाड : शहरातील एमआयडीसीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील व्यावसायिक, हातगाडी, छपऱ्या, मोठे शेड अशा तेवीस अतिक्रमणांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी हातोडा घातला. या व्यावसायिकांकडून २१ हजार रुपयांचा दंड वसूल केला. यावेळी अधिकारी, व्यावसायिक व हातगाडीवाले यांच्यात जोरदार वादावादी झाली.

शहरातील मुख्य रस्त्यावर काही व्यावसायिकांनी शेड, छपऱ्या मारून अतिक्रमणे केली होती. काही हातगाडीवाले व वीट, वाळू, खडी व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमणे केली होती. ती हटवावीत, अशी मागणी नागरिकांनी महापालिकेकडे केली होती. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार प्रभाग समिती तीनचे सहाय्यक आयुक्त दत्तात्रय गायकवाड, अतिक्रमण निर्मूलन पथकाचे सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील, स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले, सिध्दांत ठोकळे, विकास कांबळे, शाखा अभियंता अशोक कुंभार, संजय कांबळे यांच्या नेतृत्त्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. अतिक्रमणे हटविताना काही खोकीधारक, हातगाडीचालक, फेरीवाले व अधिकारी यांच्यात जोरदार वादावादी झाली. हा वाद पोलीस ठाण्यात गेला. पोलिसांनी ज्यांची तक्रार आहे, त्यांनी संबंधितांविरोधात तक्रारी दाखल कराव्यात, असे म्हणताच तक्रार दाखल करायला गेलेल्यांनी काढता पाय घेतला.

उर्वरित अतिक्रमणे पुढील आठवड्यात काढणार

सहाय्यक आयुक्त दत्तात्रय गायकवाड म्हणाले की, शहरातील उर्वरित अतिक्रमणे पुढील आठवड्यात काढण्यात येणार आहेत. संबंधित अतिक्रमणधारकांना नोटीस बजावल्या जाणार आहेत.

फोटो ओळ : कुपवाडमधील मुख्य रस्त्यावर व्यावसायिकांनी केलेली अतिक्रमणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हटविली.

Web Title: Controversial while removing encroachments in Kupwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.