भाजी विक्रेत्यांमध्ये वादावादी; एकावर कटरने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:20 IST2021-05-03T04:20:20+5:302021-05-03T04:20:20+5:30

सांगली : शहरातील मारूती रोडवर भाजी विक्रीसाठी बसण्याच्या जागेच्या वादातून एकावर कटरने हल्ला करण्यात आला. यावेळी संशयितांनी अरेरावी करत ...

Controversial among vegetable sellers; One was attacked by a cutter | भाजी विक्रेत्यांमध्ये वादावादी; एकावर कटरने हल्ला

भाजी विक्रेत्यांमध्ये वादावादी; एकावर कटरने हल्ला

सांगली : शहरातील मारूती रोडवर भाजी विक्रीसाठी बसण्याच्या जागेच्या वादातून एकावर कटरने हल्ला करण्यात आला. यावेळी संशयितांनी अरेरावी करत पोलिसांच्याही अंगावर धावून जात दहशत माजवली होती. याप्रकरणी कुमार रामलाल राठोड (रा. कोल्हापूर रोड, सांगली) याने शामराव हिंदूराव कोकरे, रवी हिंदूराव कोकरे, आशा हिंदूराव कोकरे (तिघेही रा. पाटणे प्लाॅट, हरिपूर रोड, सांगली), जयश्री आनंदा भोसले (रा. गंगाधरनगर, सांगली) आणि विनायक बिरा पुकळे यांच्याविराेधात शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मारूती रोडवर जुमराणी दवाखान्यासमोर भाजी विक्रेते बसलेले असतात. शुक्रवारी त्यांच्यात जागेवरून वाद झाला. ‘तू आमच्या जागेवर बसायचे नाही’ म्हणत संशयितांनी फिर्यादी कुमार राठोड याला मारहाण केली. तसेच त्याच्या खिशातील ३,६०० रूपये जबरदस्तीने काढून घेतल्याचेही राठोड याने फिर्यादीत म्हटले आहे. हा वाद आणखी वाढत चालला असतानाच यातील एका संशयिताने फळे कापायच्या कटरने कुमारच्या गालावर वार करून त्याला जखमी केले.

भाजी विक्रेत्यांमधील या मारामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, संशयित पोलिसांचेही ऐकत नव्हते. अखेर संशयित महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर वाद थांबला. जखमी राठोड याला उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले.

चौकट

जागेच्या कारणावरून संशयितांनी बराच गोंधळ घातल्यानंतर पोलीस आल्यानंतरही त्यांची अरेरावी सुरूच होती. पोलिसांचेही ते ऐकत नव्हते. याचवेळी कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस फौजदार शशिकांत लक्ष्मण कलकुटगी यांच्याही अंगावर धावून जात त्यांना धक्काबुक्की केली. तसेच त्यांच्या खाकी वर्दीवर असलेली नेमप्लेटही तोडून टाकली. यामुळे शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक बिरा पुकळे, आशा हिंदूराव कोकरे, जयश्री आनंद भोसले, शाम हिंदूराव कोकरे, रवी कोकरे व अन्य चार अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Controversial among vegetable sellers; One was attacked by a cutter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.